31 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरक्राईमनामादर्शना पवारच्या मृत्यूचे कारण समोर

दर्शना पवारच्या मृत्यूचे कारण समोर

अधिक तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पथके रवाना

Google News Follow

Related

राजगडाच्या पायथ्याशी एमपीएससीच्या परीक्षेत विशेष यश प्राप्त करून अधिकारी बनलेल्या दर्शना पवार हीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. दर्शना हीचा मृत्यू म्हणजे घात की अपघात असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू होता. दरम्यान, या प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दर्शनाच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे वेल्हे पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली आहे.

दर्शना दत्ता पवार (वय २६) असे या पीडित तरुणीचे नाव असून ती अहमदनरमधील कोपरगाव तालुक्यातील गावात वास्तव्यास होती. एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवल्यानंतर तिची रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवड झाली होती. ती एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावी आली होती.

शिवविच्छेदनाच्या अहवालानुसार, तिच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून पोलिसांनी दर्शना हिचा खून झाल्याचे प्राथमिक अंदाजात म्हटले आहे. तसेच त्यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार केली आहेत. पुणे ग्रामीणचे अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

प्रकरण काय?

राजगड पायथा गुंजवणे येथे राजगड घेरा आणि गुंजवणे गावाच्या हद्दीवर एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर हा मृतदेह दर्शना दत्तू पवार (वय २६) हीचा आल्याचे निष्पन्न झाले.

पुण्यात सत्कार स्वीकारायला गेल्यानंतर दर्शना बेपत्ता होती, असे तिच्या वडिलांनी पोलिसांच्या जबाबात सांगितले. तसेच दर्शनासोबत तिचा मित्रही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली.

हे ही वाचा:

झेलेन्स्कीना मिळाली ब्रिटिश पंतप्रधान सुनक यांच्या आईकडून गोड भेट…

‘न्यूज अरेना इंडिया’च्या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपा अव्वल, तर फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून पसंती

सिक्कीममध्ये पावसाचा तांडव, ३०० पर्यटकांना बाहेर काढण्यात यश

मराठी भाषेवरून गुंदेचा हायस्कूलला मनसेचा दणका !

दर्शना ही ९ जून रोजी पुणे येथे वनविभागाच्या परीक्षेत (आर, एफ, ओ) विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार घेण्यासाठी आली होती. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी १० तारखेपर्यंत सायंकाळी ४ वाजेपर्यंत कुटुंबाच्या संपर्कात होती. मात्र, त्यानंतर तिने कुटुंबीयांचे फोन उचलले नाहीत म्हणून पुणे येथे चौकशी केली असता दर्शना तिचा मित्र राहुल हंडोरेसोबत सिंहगड आणि राजगड पाहण्यासाठी गेल्याचे समजले. मात्र, ते दोघेही संपर्कात नसल्याचे आणि परतले नसल्याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दर्शना हरविल्याची तक्रार करण्यात आली.

राजगड पायथा येथे तपास केला मात्र काहीही सुगावा लागला नाही म्हणून गुंजवणे येथे दर्शनाचा फोटो देण्यात आला होता. त्यानंतर गावातील काही नागरिक त्या भागाकडे गेले असता त्यांना तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून वर्णनावरून मृतदेह दर्शनाचा असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा