भोपाळ, मध्य प्रदेश येथे एका तरुणाच्या गळ्यात पट्टा अडकवून त्याला कुत्र्यासारखे भुंकायला लावण्यात आले आणि त्याने साहिल नावाच्या व्यक्तीची माफी मागण्यास सांगण्यात आले. या सगळ्या प्रकाराचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारने याची दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले.
राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत या प्रकरणातील आरोपींच्या घरावर हातोडा मारण्यात आला असून ती घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी हे आदेश दिले. या प्रकरणातील तीन आरोपींची घरे जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याप्रमाणे त्यांच्या घरावर हातोडा चालविण्यात आला.
#WATCH | Local administration in the presence of police demolishes the residence of Sameer Khan who is accused of brutally thrashing and harassing a youth in Bhopal #MadhyaPradesh pic.twitter.com/bj4urY0WVm
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 19, 2023
५० सेकंदांच्या या व्हीडिओत दिसत होते की, एका तरुणाच्या गळ्यात पट्टा अडकवून त्याला कुत्रा होण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्याला सांगण्यात येत होते की, बोल साहिल भाई सॉरी. एकाने हा पट्टा हातात धरला होता तर दुसरा त्याला माफी मागण्यासाठी धमकावत होता. माफी माग, कुत्र्यासारखा भुंकून दाखव. पळण्याचा प्रयत्न करू नको. साहिल भाई जे काही सांगत आहे त्याप्रमाणे कर. त्यावर तो पट्टा बांधलेला तरुण म्हणत होता की, साहिल भाई मेरे बाप है, मेरे बडे भाई है. मेरी माँ उनकी माँ है, उनकी माँ मेरी माँ है. तो तरुण सातत्याने सांगत होता की, मी माफी मागितली आहे पण मी काहीही केलेले नाही.
हे ही वाचा:
सिक्कीममध्ये पावसाचा तांडव, ३०० पर्यटकांना बाहेर काढण्यात यश
नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना मासे खाण्याचा सल्ला का दिला?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम शाखा करणार समान नागरी कायद्याचा प्रसार
मराठी भाषेवरून गुंदेचा हायस्कूलला मनसेचा दणका !
यावर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले होते की, आपण हा व्हीडिओ पाहिला आहे. याप्रकारचे कृत्य निषेधार्ह आहे. भोपाळ पोलिसांना या प्रकरणात कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.