31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
घरविशेषआंतरराष्ट्रीय 'योग दिनानिमित्त' भाजपातर्फे राज्यभर विशेष कार्यक्रमांचा धडाका !

आंतरराष्ट्रीय ‘योग दिनानिमित्त’ भाजपातर्फे राज्यभर विशेष कार्यक्रमांचा धडाका !

भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय योग दिनी राज्यातील सर्व ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपातर्फे ‘योग रील’ स्पर्धेसोबतच अन्य विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आणि या कार्यक्रमाच्या प्रदेश संयोजक चित्रा वाघ यांनी शनिवारी दिली.

 

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा वर्षा भोसले व प्रदेश सरचिटणीस रश्मी जाधव यावेळी उपस्थित होत्या. यंदा ‘वसुधैव कुटुंबकम’ या कल्पनेवर आधारीत आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा होणार आहे. २१ जून रोजी सकाळी ९.०९ मिनिटांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणा-या विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही श्रीमती वाघ यांनी केले.

 

श्रीमती वाघ म्हणाल्या की, एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांची काळजी घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताचे नवनिर्माण होत आहे आणि देशाची प्रगती वेगाने होत आहे. तणावमुक्त जीवनासाठी आवश्यक योग साधनेचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त राबवल्या जाणा-या उपक्रमा अंतर्गत यंदा विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. एक इन्स्टा रील ची स्पर्धा घेण्यात येणार असून,२१ जूनपर्यंत सर्वांनी @BJP4Maharashtra या इन्स्टाग्राम अकाउंटवर योगसाधना करतानाचे रील पोस्ट करावेत असे आवाहन श्रीमती वाघ यांनी केले.

हे ही वाचा:

केरळ चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन यांचा भाजपला रामराम, पण निष्ठा मोदींसोबत

युगांडामध्ये इसिसशी संबंधित संघटनेकडून शाळेवर दहशतवादी हल्ला

काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाले आणि कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

सुट्टीवर गेलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मनिषा कायंदे शिवसेनेत जाणार

रील चे हॅशटॅग #Yogafor9@9 हे असेल व ज्या रील ला सर्वाधिक लाइक्स व जे रील सर्वाधिक रीट्वीट केले जातील अशा रील्स ना भाजपा लोकप्रतिनिधींमार्फत बक्षीस दिले जाणार आहे. या दिवशी ९ मिनिटांचा पॉवर योगासनांचा कार्यक्रमही सादर आहे. त्याचबरोबर गेट वे ऑफ इंडीया इथे ९.०९ मि. नी ९० महिला नऊवारी नेसून अभिनव पद्धतीने योग प्रात्यक्षिके सादर करणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

महिलांकरिता सहकारी संस्थांचे प्रशिक्षण शिबिर

राज्यात उद्या सोमवारी १९ जूनला महाराष्ट्रातील महिलांसाठी सहकारी संस्थांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात येईल, अशी माहितीही श्रीमती वाघ यांनी दिली. या शिबीराचे उद्घाटन ना.आ. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. आ. प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून होणा-या या शिबीरामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा