30 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेषसुट्टीवर गेलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मनिषा कायंदे शिवसेनेत जाणार

सुट्टीवर गेलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मनिषा कायंदे शिवसेनेत जाणार

तीन माजी नगरसेवकही शिंदेसोबत जाण्यास तयार, शिशिर शिंदेंनंतर ठाकरे गटात अनेक उलथापालथी

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे युरोप दौऱ्यावर असताना इथे भारतात आणि महाराष्ट्रातील ठाकरे गटात अनेक उलथापालथी झाल्या असाव्यात. कारण उद्धव ठाकरे भारतात परतल्यानंतर त्यांच्या गटाला धक्का बसला आहे तो त्यांच्या गटाच्या विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे आणि तीन माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार आहेत. ठाकरे गटाला यामुळे मोठा धक्का बसणार आहे.

रविवारी रात्री कायंदे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासह तीन माजी नगरसेवकही शिंदे यांना साथ देणार आहेत. कायंदे या गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याचे म्हटले जात होते. आता १९ जूनला असलेल्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार नसल्यामुळे चर्चा रंगू लागली आणि त्या शिवसेनेत जाणार असल्याच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्याशी संपर्क मात्र कुणाचाही झालेला नाही.

कायंदे यांचा पेशा मूळचा शिक्षकी होता. त्यांना तत्कालिन शिवसेनेचे प्रवक्तेपद मिळाले होते. त्यांना विधान परिषदेची आमदारकीही मिळाली. त्याला विरोधही झाला होता तरीही त्यांना ही आमदारकी देण्यात आली. आता मात्र त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असून त्याचा मोठा फटका ठाकरे गटाला बसणार आहे.

हे ही वाचा:

संगमनेरमध्ये ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतराचा प्रयत्न

परीक्षेलाही बुरखा घालू द्या, म्हणत तेलंगणात मुलींकडून निषेध!

तिसऱ्या आघाडीसाठी जितनराम मांझी प्रयत्नशील? १९ जूनला निर्णय

अनधिकृत दर्गा हटविण्याच्या नोटिशीनंतर मुस्लिमांची पोलिसांवर दगडफेक

यासंदर्भात ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले की, कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका बदलला की तो कचरा आमच्या दारात येऊन पडतो.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे आणखी एक ज्येष्ठ नेते शिशिर शिंदे यांनीही उद्धव ठाकरे गटाला रामराम केला आणि ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले जात आहे. याआधी ते मनसेमध्ये होते. पण तिथून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ते शिवसेनेत आले.   

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा