28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरधर्म संस्कृतीपरीक्षेलाही बुरखा घालू द्या, म्हणत तेलंगणात मुलींकडून निषेध!

परीक्षेलाही बुरखा घालू द्या, म्हणत तेलंगणात मुलींकडून निषेध!

गृहमंत्री म्हणाले की, बुरखा घालू नका असे कुठेही म्हटलेले नाही. अधिकाऱ्यांवर कारवाई करू

Google News Follow

Related

शाळेतही हिजाब घालण्याची परवानगी द्यावी किंबहुना, तो आमचा अधिकारच आहे, अशा पद्धतीने मतप्रदर्शन करत कर्नाटकमध्ये मध्यंतरी आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले होते. आता तेलंगणात हिजाब आणि बुरख्याच्या निमित्ताने असाच एक प्रकार घडला आहे.

हैदराबादच्या संतोषनगर येथील के.व्ही. रंगारेड्डी कॉलेजात उर्दू माध्यमाच्या पदवी परीक्षेसाठी काही मुली आल्या होत्या पण परीक्षेला बसताना त्यांना बुरखा काढण्यास सांगण्यात आले. त्यावरून त्या मुलींनी निषेध नोंदवला. एवढेच नव्हे तर तेलंगणाचे गृहमंत्री मेहमूद अली यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत बुरखा काढण्याची मागणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. एवढेच नव्हे तर मुलींनी कमी कपड्यात वावरता कामा नये, असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत.

मंत्री मेहमूद अली म्हणाले की, एखाद्या मुख्याध्यापकाने हे कृत्य केले असेल पण आमचे धोरण पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहे. लोकांना जो वेश परिधान करायचा असेल तो वेश ते परिधान करू शकतात. बुरखा घालू नये असे कुठेही लिहिलेले नाही. आम्ही यासंदर्भात कारवाई करू.

हे ही वाचा:

केरळ चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन यांचा भाजपला रामराम, पण निष्ठा मोदींसोबत

युगांडामध्ये इसिसशी संबंधित संघटनेकडून शाळेवर दहशतवादी हल्ला

तिसऱ्या आघाडीसाठी जितनराम मांझी प्रयत्नशील? १९ जूनला निर्णय

मदरशात शिक्षण घेण्यासाठी बिहारमधून आलेल्या मुलांना परत पाठवले!

मेहमूद अली म्हणाले की, जर तुम्ही युरोपियन पद्धतीचे कपडे घालाल तर ते योग्य नाही. आपण चांगले कपडे घातले पाहिजेत. विशेषतः महिलांनी ही काळजी घेतली पाहिजे. जर महिलांनी कमी कपडे घातले तर समस्या निर्माण होईल. जर महिलांनी जास्त कपडे घातले तर शांतता टिकून राहील.

दरम्यान, परिक्षेला बसलेल्या या मुलींनी म्हटले आहे की, कॉलेज व्यवस्थापनाने परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी आम्हाला बुरखा काढण्यास सांगितले होते. काही मुलींनी मात्र बुरखा काढून परीक्षा केंद्रात प्रवेश केला. या घटनेनंतर पालकांनीही गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा