सांगली येथे नेल्या जाणाऱ्या बिहारमधील ३० अल्पवयीन मुलांची ३१ मे रोजी मनमाड रेल्वे पोलिसांनी सुटका केली होती. अखेर शुक्रवारी ही मुले परतीच्या प्रवासाला निघाली आहेत. आठ ते १६ वर्षे वयोगटातील या मुलांना बिहारच्या पूर्णिया आणि अररिया जिल्ह्यातून सांगलीला नेले जात होते. ते ज्यांच्यासोबत प्रवास करत होते, ते त्यांच्या पालकांचे संमतीपत्र देऊ न शकल्याने रेल्वे पोलिसांनी त्यांना खाली उतरवले. तेव्हापासून ती नाशिकच्या बाल कल्याण समितीकडे होती.
बाल कल्याण समितीच्या निर्देशांनुसार, शहर पोलिस, रेल्वे पोलिस, महिला व बाल विकास विभाग, नाशिक आणि बालगृहातील पाच अधिकाऱ्यांच्या मदतीने ही मुले बिहारमधील आपल्या घरी परतत आहेत. ही सर्व मुले नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून एलटीटी गुवाहाटी एक्स्प्रेसमध्ये बसून महिला व बालविकास विभागाने त्यांच्या घरी जाण्यासाठी आरक्षित केलेल्या विशेष डब्यात चढली. बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांचे सामाजिक मूल्यमापन झाल्यानंतर बालकल्याण समितीने मुलांना त्यांच्या संबंधित बालकल्याण समितीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. ही समिती मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्याचा निर्णय घेतील.
हे ही वाचा:
इंग्लंडचा आक्रमक खेळ; पहिल्याच दिवशी ३९३ धावांवर डाव घोषित
पळवून नेलेल्या हिंदू तरुणीचा ‘निकाह’ पोलिसांनी रोखला
मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
“इस्लाम कबूल कर, नाहीतर गोळ्या घालेन”, अल्पवयीन मुलीला धमकी
या मुलांन सांगलीतील मदरशांमध्ये नेले जात असल्याचा आरोप आहे. मुलांना भेटण्यासाठी नाशिकला आलेल्या आणि १ जूनपासून शहरात तळ ठोकून बसलेल्या त्यांच्या पालकांनी दावा केला की, अल्पवयीन मुलांना नाशिक आणि सांगलीसह इतर ठिकाणच्या मदरशांमध्ये पाठवणे हा त्यांचा नित्यक्रम होता. ‘आम्हाला आनंद आहे की मुले शेवटी घरी परतत आहेत,’ असे पालकांपैकी एक मोहम्मद महजूब म्हणाले. नाशिकला आलेल्या २१ पालकांपैकी पाच पालक नाशिकमध्येच होते. तर, बाकीचे गुरुवारी बिहारला परतले. मोहम्मद वारिस हे दुसरे पालक मुलांसह त्याच ट्रेनमध्ये परंतु वेगळ्या डब्यात चढले.