कोलकातामधील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आत आग लागल्याची घटना बुधवार, १४ जून रोजी रात्री घडली. गर्दीच्या वेळी विमानतळावर आगीचा भडका उडला आणि एकच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवण्यात आले.
कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री नऊच्या सुमारास चेक इन काउंटरजवळ आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आगीची घटना घडली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
विमानतळावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता विमानतळाच्या गेट क्रमांक 3A च्या १६ क्रमांकाच्या डिपार्चर काउंटरजवळ ही आग लागली. रात्री नऊ वाजेच्या सुमारास विमानतळाच्या गेट क्रमांक 3 वर अचानक धुराचे लोट आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर लगेच विमानतळावर तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांना याबाबतची माहिती देण्यात आली.
हे ही वाचा:
‘बिपरजॉय’चा असाही वादळी विक्रम
सुसज्ज गुजरात करणार बिपरजॉयचा सामना
अमेरिकी राजदूत डोभालबद्दल म्हणाले, उत्तराखंडच्या गावातला मुलगा राष्ट्राचा आधार बनला!
कुस्ती महासंघाच्या निवडणूक निकालाचे चित्र ६ जुलैला होणार स्पष्ट
सीआयएसएफ जवानांनी तातडीने विमानतळ परिसर पूर्णपणे रिकामा करून घेतला. आग लागल्यानंतर सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवळपास तीन गाड्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली.