भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची स्तुती केली आहे. ‘उत्तराखंडच्या गावामधील एक मुलगा केवळ राष्ट्राचा आधारच नव्हे तर आंतरराष्ट्रीय संपत्ती ठरला आहे. मी जेव्हा भारत आणि अमेरिकेच्या संबंधांकडे पाहतो, तेव्हा ते दृढ झाल्याचे मला जाणवतात,’ असे कौतुक गार्सेटी यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर आहेत. या अति महत्त्वाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन मंगळवारी भारतात पोहोचले. या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान जे करारमदार होतील, त्यांचा अंतिम आराखडा ठरवण्यासाठी ते भारतात आले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यातून सकारात्मक परिणामांची निष्पत्ती होईल, अशी आशा व्यक्त केली.
हे ही वाचा:
मोबाईलसाठी एक लाख चोरले, पण वडिलांच्या धाकाने केली आत्महत्या!
वसईत धर्मांतरप्रकरणी मुंब्र्यातून एकाला अटक
शिवरायांची प्रेरणा!! महाराष्ट्रातील पाच ठिकाणे होणार शिवसृष्टीमय
जीवरक्षकाला हुलकावणी देत जुहूकिनारी गेलेल्या ‘त्या’ चारही मुलांचे मृतदेह सापडले
‘भारत आणि अमेरिका जागतिक प्रगतीमध्ये समसमान भागीदार आहेत. जेव्हा मी भारत आणि अमेरिकेच्या संबंधांकडे पाहतो, तेव्हा ते दृढ आहेत, हे मला जाणवते. भारतीय हे अमेरिकींवर आणि अमेरिकी नागरिक भारतीयांवर प्रेम करतात,’ असे गार्सेटी यांनी सांगितले. याच कार्यक्रमात त्यांनी भारताच्या डिजिटल क्रांतीचेही कौतुक केले. ‘भारताने डिजिटल पेमेंट आणि वित्तीय तंत्रज्ञानातील कामगिरीने संपूर्ण जगाला अचंबित केले आहे. एका गावातला चहावालासुद्धा त्याच्या फोनवर सरकारकडून पेमेंट घेतो,’ अशा शब्दांत त्यांनी भारतातील डिजिटल पेमेंटच्या क्रांतीचे कौतुक केले. या कार्यक्रमात जॅक सुलिवन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेतली.