केरळच्या विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराने त्याची पाकिस्तानी बायको असल्याची माहिती लपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केरळची सत्ताधारी पार्टी असलेल्या सीपीएमने समर्थन दिलेल्या केटी. सुलेमान हाजी यांची दुसरी बायको ही पाकिस्तानी असल्याची माहिती त्यांनी निवडणुक जाहीरनाम्यातून लपवल्याचे समोर आले आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
KTSulaiman Haji, a @CPIMKerala backed candidate in Kondotty has hidden the details of his 2nd wife, 19 years old Pakistani in his nomination.
The so-called Liberal – @VijayanPinarayi's silence isn't surprising.@narendramodi @AmitShah @JPNadda @JoshiPralhad @surendranbjp pic.twitter.com/vZ3UQgQIVj
— V Muraleedharan (@VMBJP) March 22, 2021
केरळमध्ये ६ एप्रिलला विधानसभेच्या निवडणुका आहेत. कोन्डोट्टी विधानसभेमध्ये सीपीएमने समर्थन केलेल्या केटी. सुलेमान हाजी या उमेदवाराने त्यांची दुसरी बायको पाकिस्तानी असल्याचे उमेदवारी अर्जातून लपवल्याचा प्रकार समोर आला आहे. हाजी यांनी हिरा सफदर मुहम्मद या १९ वर्षीय पाकिस्तानी मुलीशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हे ही वाचा:
राज्यात सुरू असलेल्या खंडणीखोरीच्या राजकारणातून वेळ मिळाला तर ही कामे होतील
पवारांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश
अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करा
राज्याने दरोडे घातले तर तपास केंद्र सरकारलाच करावा लागेल
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ट्विट करत या प्रकारावर मुख्यमंत्री पिनराइ विजयन यांना जाब विचारला आहे. या प्रकरणावर ‘तथाकथित’ उदारमतवादी पिनराइ विजयन यांनी मौन धरून बसणे यात काहीच आश्चर्यजनक नाही, असेही ते म्हणाले. पाकिस्तानमधील दुसरी बायको असल्याची माहिती लपवल्यामुळे सुलेमान हाजी यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.