मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परमबीर सिंह यांनी त्यांची बदली गृह संरक्षण दलात केल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याशिवाय त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणीही केली आहे. या व्यतिरिक्त त्यांनी राज्य सरकारकडून आणल्या जाणाऱ्या दबावाविरद्ध संरक्षणही मागितले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शनिवार २० मार्च रोजी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहलं. त्या पात्रातून त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करायला सांगितले होते, असा खळबळजनक आरोप केला आहे. देशमुखांनी वाझेला मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट्स आहेत त्यातूनच ४०-५० कोटी जमा होतील असेही सांगितले. या प्रकारे वसुली कशी करावी याची माहितीही त्यांनी दिली असाही आरोप परमबीर सिंह यांनी केला. परमबीर सिंह यांनीं केलेल्या आरोपांनंतर सरकारमधील अनेक मंत्री नेते आणि खुद्द शरद पवार यांनी सुद्धा परमबीर सिंह यांना खोटारडे ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता परमबीर सिंह यांनी या सर्व प्रकारची सीबीआय कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
हे ही वाचा:
राज्याने दरोडे घातले तर तपास केंद्र सरकारलाच करावा लागेल
राज्यपालांनी सत्यकथन करणारा अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवावा
ज्युलिओ रिबेरोंकडून शरद पवारांच्या मागणीला केराची टोपली
पवारांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश
परमबीर सिंह यांच्यावर राज्य सरकारकडून दबावही टाकला जात आहे असे दिसत आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये त्यांनी राज्य सरकारकडून टाकण्यात येणाऱ्या दबावाविरुद्ध संरक्षणही मागितले आहे.