27 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
घरविशेषडबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय 

डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय 

Google News Follow

Related

मुंबईमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणा-या डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी व डबेवाले संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात आमदार श्रीकांत भारतीय यांनी सांगितले की, १८९० पासून मुंबईमध्ये सेवा पुरवणाऱ्या डबेवाल्यांना मालकीची घरे मिळावीत, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या बाबत आपण विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी फडणवीस यांनी डबेवाल्यांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते. त्या नुसार बैठकीचे आयोजन केले होते. म्हाडा, सिडको तसेच महसूल विभागाकडून जागा घेऊन डबेवाल्यांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

हे ही वाचा:

सादरीकरणावेळी मंचावरचं भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन

लव्ह जिहादमुळे राष्ट्रीय बेसबॉलपटूची आत्महत्या, हिंदू असल्याचे दाखवत मुलाने फसवले

पालखी मार्ग, वारकऱ्यांची विश्रांती स्थाने, पाण्याची व्यवस्था उत्तम राखा!

कोल्हापुरात ४८ तासानंतर सगळे इंटरनेटवर ऍक्टिव्ह

डबेवाल्यांना त्यांची सेवा देणे सोईस्कर होईल अशा ठिकाणी त्यांना घरे देण्यात येतील,असेही आ.भारतीय म्हणाले.डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न शिंदे- भाजपा सरकारने अतिशय संवेदनशीलतेने हाताळला आणि मार्गी लावला त्याबद्दल आ. भारतीय यांनी फडणवीस यांचे आभार मानले. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी उपयुक्त असलेले मुंबई डबेवाला भवन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे आ. भारतीय म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
179,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा