30 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरविशेष...म्हणून ममता बॅनर्जी यांनी मोदींना पाठवले लक्ष्मणभोग आंबे!

…म्हणून ममता बॅनर्जी यांनी मोदींना पाठवले लक्ष्मणभोग आंबे!

लक्ष्मणभोग आंब्यांबरोबरच हिमसागर, फाजली, लंगडा या आंब्याच्या जातीही पाठविण्यात आल्या आहेत.

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील खास आंब्यांची भेट पाठवली आहे. त्या काही वर्षांपासून अनेकांन आंबे पाठवत आहेत. हे आंबे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनाही पाठवण्यात आले आहेत. या आंब्यांमध्ये लक्ष्मणभोग आंब्यांचा समावेश आहे. त्या आंब्यांचे असे कोणते वेगळेपण आहे, ज्यासाठी ममता बॅनर्जी यांनी हे आंबे पंतप्रधान मोदींना पाठवले?

सजवलेल्या पेट्यांमधून हे आंबे पाठवण्यात आले आहेत. या पेट्यांमध्ये लक्ष्मणभोग प्रमाणेच हिमसागर, फाजली, लंगडा  या जातीचे आंबे असून ते एक-दोन दिवसांत दिल्लीत पोहोचतील. या आंब्यांना मंगळवारी संध्याकाळी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानामधील एका सूत्राने दिली.   लक्ष्मणभोग आंब्यांचा पश्चिम बंगालशी खूप जवळचा संबंध आहे. पश्चिम बंगालमध्ये आंब्याची लस्सी, आइस्क्रीम, चटण्या आणि लोणची यासाठी या लक्ष्मणभोग आंब्याचा मोठा वापर होतो. पश्चिम बंगालची संस्कृती, परंपरा, चव, शेतीतील क्षमता यांची एक आठवण म्हणूनही लक्ष्मणभोग या आंब्याकडे पाहिले जाते.

हे आंबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून पश्चिम बंगालमधील शेती उत्पादनांचा प्रचार आणि प्रसार करण्याचाही ममता बॅनर्जी यांचा उद्देश आहे. लक्ष्मणभोग आंब्यांमुळे पश्चिम बंगालमधील अर्थकारण आणि शेतकऱ्यांचे कष्ट यावर प्रकाश टाकला जातो.   लक्ष्मणभोग आंबे हे छोट्या किंवा मध्यम आकाराचे असतात पण परिपक्व झाल्यावर त्यांच्या गंधामुळे ते विशेषत्वाने ओळखता येतात. आंब्याच्या आतील गर हा घट्ट आणि रसाळ असल्यामुळे आंबाप्रेमींसाठी लक्ष्मणभोग आंबा हा वेगळी मेजवानी असते.

मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी बांगलादेशच्या मुख्यमंत्री शेख हसिना यांनाही आंब्याच्या पेटीसमवेत शुभेच्छा पाठवल्या आहेत. सन २०२१मध्ये शेख हसिना यांनी पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांना भेट स्वरूपात दोन हजार ६०० किलो आंबे पाठवले होते. बांगलादेशच्या ट्रकमधून ‘हरिभंगा’ जातीच्या आंब्याचे २६० डबे होते. गेल्या वर्षी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसनेत्या सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आंबे पाठवले होते.

हे ही वाचा:

आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेट जैसे थे स्थितीत

‘स्टीव्ह स्मिथ आमच्या पिढीतील सर्वोत्तम कसोटी फलंदाज’

‘गोव्यातील पोर्तुगीजांच्या खुणा पुसण्याची वेळ आली’

शतकवीर हेड आणि स्मिथची अडीचशे धावांची भागीदारी

मुख्यमंत्री बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहिलेले आहेत. मात्र दुर्गापुजेदरम्यान ममता बॅनर्जी यांनी मोदी यांना कुर्ता-पायजमा आणि मिठाई पाठवल्याची आठवण सन २०१९मध्ये पंतप्रधानांनी काढली होती. ‘विरोधी पक्षांमध्ये माझे अनेक स्नेही आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ममतादीदी स्वत: दरवर्षी माझ्यासाठी एक किंवा दोन कुर्त्यांची निवड करतात,’ असे मोदी तेव्हा म्हणाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा