30 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरविशेषनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टीमॉडेल विमानतळ असणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टीमॉडेल विमानतळ असणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विमानतळाच्या कामाची हवाई पाहणी

Google News Follow

Related

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची हवाई पाहणी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरू व्हावे यासाठी पाहणी केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सुरु असणाऱ्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा या भागांसाठी महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते विमानतळाचे भूमीपूजन झाले होते आणि उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होईल. विमानतळ उभारणीत चांगले आणि वेगाने काम सुरु आहे यांचा आनंद आहे. हा प्रकल्प लवकरच लोकांसाठी खुला होईल यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

नवी मुंबई विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरू असून हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ असेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असल्याने हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल. नवी मुंबईमधील विमानतळ हे मल्टीमॉडेल विमानतळ असणार आहे. मुंबईला विमानतळाच्या माध्यमातून एक चांगली भेट देणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

‘बीबीसीची करचुकवेगिरीची कबुली म्हणजे भारतविरोधी अजेंड्याला पाठिंबा’

उत्तर काशीत लव्ह जिहादच्या संशयावरून मुस्लिमांची दुकाने बंद करण्याची मागणी

‘वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औरंगजेब, टिपू सुलतनाचं उदात्तीकरण होणं हा योगायोग नाही’

बीबीसीकडून ४० कोटींच्या कर चुकवेगिरीची कबुली

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील २२ किलोमीटरचा सीलिंक महत्वाचा दुवा ठरेल. दरवर्षी नऊ कोटी प्रवासी वाहतूक होईल. पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून ४२ विमाने उभी राहतील. ५ हजार ५०० क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ ११.४ किलोमीटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्या असतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा