29 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरविशेषबिहारमधील पडलेल्या पुलाची जबाबदारी असलेली सिंगला कंपनी निशाण्यावर

बिहारमधील पडलेल्या पुलाची जबाबदारी असलेली सिंगला कंपनी निशाण्यावर

पाटणा येथे नितीश कुमार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या लोहिया चक्र पथाचे बांधकाम सुरू असताना काँक्रीटचा स्लॅब पडूल तीन मुलांचा मृत्यू झाला होता

Google News Follow

Related

बिहारमधील भागलपूर येथील गंगा नदीवर बांधल्या जाणाऱ्या पुलाची जबाबदारी हरयाणातील एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली होती. या कंपनीचे मोठमोठे ग्राहक असून ही कंपनी याआधीही वादात सापडली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे तसेच, घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्ती शोधण्याचे आदेश मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिले आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु प्रकल्पांचे निकृष्ट बांधकाम आणि सुरक्षा मानकांबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

कोण आहेत कंपनीचे अध्यक्ष?

एसपी सिंगला कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष सतपॉल सिंगला आहेत. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील गंगा नदीवर अगुवानी-सुलतानगंज दरम्यानचा पूल बांधण्याचे काम या बांधकाम फर्मला देण्यात आले होते. एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्स हा एका कुटुंबाचा व्यवसाय आहे. दिल्ली आणि हरियाणा येथे या कंपनीची नोंदणीकृत कार्यालये आहेत. १९९६मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने अल्पावधीतच भरभराट केली आहे. कंपनीच्या कॉर्पोरेट घोषणांनुसार, आर्थिक वर्ष २०२२मध्ये कंपनीची निव्वळ संपत्ती अंदाजे ८६९ कोटी रुपये होती. कंपनीच्या वेबसाइटनुसार, ही कंपनी पुलाचे बांधकाम, शहरातील उड्डाणपुलाचे बांधकाम, उन्नत रस्ता, स्थानक इमारत बांधकाम आदी बरीच बांधकामे करते.

आधीही वादात

पाटणा येथे नितीश कुमार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या लोहिया चक्र पथाचे बांधकाम सुरू असताना काँक्रीटचा स्लॅब पडल्याने तीन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे मे २०२० मध्ये ही कंपनी पहिल्यांदाच वादात सापडली होती. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. परंतु नंतर काय झाले हे कळू शकले नाही. कारण बांधकाम कंपनीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्सकडे बिहारमधील अनेक सरकारी प्रकल्प आहेत. ज्यात पाटणा येथील गंगा नदीवरील सहा पदरी पूल, ,जवाहरलाल नेहरू रोडवरील लोहिया पथ चक्र आणि शेरपूर-दिघवारा पुलाचा समावेश आहे.

हे ही वाचा:

कुरापती चीनकडून अक्साई चीनपर्यंत रस्ते, कॅम्प, हेलिपॅड्सची उभारणी

एनसीबीची मोठी कारवाई, १५ हजार एलएसडी ड्रग पाऊच जप्त

गेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतर करण्याचा घाट, पोलिसांनी केला पर्दाफाश

‘काँग्रेसने द्वेषाचा शॉपिंग मॉल उघडला आहे’

कंपनीचे काही ग्राहक

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जम्मू आणि काश्मीर बांधकाम प्राधिकरण, बिहार राज्य पूल निर्माण निगम, जीएसआयडीसी, गोवा; दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, लखनऊ मेट्रो रेल कॉर्पोरेशन, कोची मेट्रो रेल, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया, रेल विकास निकब, पंजाब इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बोर्ड, सीपीडब्लूडी, नवी दिल्ली; भारतीय रेल्वे, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा. पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यांची सार्वजनिक बांधकाम विभाग.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा