उत्तर प्रदेशातील पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिसाने तिच्यासोबत ‘लव्ह जिहाद’ झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तिचा आरोप आहे की, तिचा पती याआधीच विवाहित होता. त्याने ही बाब लपवली होती. तिच्याशी खोटे बोलून लग्न केले आणि धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. तसेच, दिराने बलात्कार केल्याची तक्रारही तिने केली आहे.
उत्तर प्रदेशातील पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या महिलेने ती ‘लव्ह जिहाद’ची बळी ठरल्याचा आरोप केला आहे. तिच्या नवऱ्याने आधीचा विवाह लपवून तिच्याशी खोटे बोलून लग्न केले, असा आरोप तिने केला आहे. आता या दोघांना मूलही आहे. त्या मुलाचाही धर्म बदलण्यासाठी तिचा पती दबाव आणत असल्याचा आरोप तिने केला आहे. इतकेच नव्हे तर एका घरगुती सोहळ्यात तिच्या दिराने तिच्यावर बलात्कारही केला होता, असाही आरोप तिने केला.
मूळ वाराणसीतील असणारी ही महिला हवालदार शिवकुटी पोलिस ठाण्यात तैनात आहे. तर, तिचा पतीदेखील उत्तर प्रदेशात हवालदार असून तिचा वरिष्ठ आहे. पोलिसांच्या प्रशिक्षणादरम्यान या दोघांची एकमेकांशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होऊन दोघांचा विवाह झाला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, या पोलिसाने तिला तो बौद्ध धर्म स्वीकारून तिच्यासोबत राहण्याचे आश्वासन दिले होते. या म्हणण्यानुसार, त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून अशोक नाव लावले होते. मात्र काही वेळानंतर त्याने पुन्हा इस्लाम धर्म स्वीकारला. या पीडितेने एका मुलालाही जन्म दिला आहे.
पती तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता. तसेच, मुलाचेही धर्मांतर करण्याचा त्याने प्रयत्न केला. तो मुलाला नमाज अदा करायला आणि दुआ मागण्यास सांगत असे आणि पूजा करण्यापासून रोखत असे, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच, तिचा पती आधीपासून विवाहित होता. मात्र लग्न होत असताना त्याने आपण घटस्फोट घेत असल्याचे खोटेच सांगितले होते. तर ती जेव्हा सासरी जात असे, तेव्हा पहिल्या पत्नीशी ओळख वहिनी म्हणून तो करून देत असे, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा:
१५ मिनिटांत एटीएम फोडून १९ लाख चोरून पसार
उद्धव ठाकरेंचा गट म्हणजे चायनीज शिवसेना
सुलोचना दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमात होणार अंत्यसंस्कार
हेरॉईन घेऊन येणारं पाकिस्तानी ड्रोन सुरक्षा दलाच्या जवानांनी पाडलं
आयपीएलमध्ये खेळलेल्या दिराने केला बलात्कार
महिला एका कार्यक्रमादरम्यान सासरी गेली असताना, तिथे तिच्या दिराने तिच्यावर बलात्कार केल्याचाही आरोप केला आहे. त्यानंतर या महिला हवालदाराने सासरे, दीर आणि पतीवर अनैसर्गिक बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र ती आणि तिचा पती दोघेही पोलिस असल्याने पोलिसांनी हे प्रकरण दाबल्याचे तिचे म्हणणे आहे. तर, तिचा दीर क्रिकेटपटू असून तो यंदाही आयपीएलमध्ये खेळल्याचे तिने म्हटले आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की, जे चित्रपटात दाखवले आहे, तेच माझ्याबाबत घडले आहे,’ असे या महिलेने म्हटले आहे.