32 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरक्राईमनामा१५ मिनिटांत एटीएम फोडून १९ लाख चोरून पसार

१५ मिनिटांत एटीएम फोडून १९ लाख चोरून पसार

१५ मिनिटांत एटीएमची तोडफोड करून १९ लाख रुपये चोरून पलायन

Google News Follow

Related

अवघ्या १५ मिनिटांत एका राष्ट्रियीकृत बँकेच्या एटीएमची तोडफोड करून १९ लाख रुपये चोरून चार चोरांनी पलायन केल्याची घटना रविवारी पहाटे वसईत घडली. एटीएममध्ये रोख रक्कम ठेवला जाणारा बॉक्स फोडण्यासाठी गॅसकटरचा उपयोग करण्यात आला होता. त्यामुळे हे सराईताचे काम असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाला एटीएममध्ये चोरी केल्याचा एक निनावी कॉल आला होता, मात्र पोलिस पोहोचेपर्यंत चोरांनी आपले काम फत्ते करून पोबारा केला होता.

ही घटना वसई पूर्वेकडील गोलाणी नाका येथील डीप टॉवर इमारतीमध्ये घडली. येथील १३ क्रमांकाच्या गाळ्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ही चोरी करण्यात आली. लोकरीच्या टोप्या घातलेल्या चौघांचा या चोरीमध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या चार चोरांपैकी तिघांनी एटीएममध्ये प्रवेश करून शटर खाली खेचले. तर एका साथीदाराने बाहेर पाळत ठेवली असावी. त्यांनी एटीएम किओस्कमधील क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेऱ्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले.

फुटेजमध्ये काळा शर्ट आणि पायजमा तसेच लोकरीची टोपी आणि शाल पांघरलेली एक व्यक्ती कॅमेरा नष्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच, एटीएमच्या बॉक्समधील रोख रक्कम काढण्यासाठी बॉक्स उघडण्याकरिता गॅस कटरचा वापर करण्यात आला. हातमोजे, चाकू आणि स्क्रू ड्रायव्हरची जोडी चोरांनी तिथेच ठेवून पलायन केले होते. शनिवार, रविवारच्या पार्श्वभूमीवर मशीनमध्ये १९ लाख रुपये ठेवण्यात आले होते, अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली.

हे ही वाचा:

बिहारमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला

‘महाभारत’ मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारणारे गुफी पेंटल काळाच्या पडद्याआड

हेरॉईन घेऊन येणारं पाकिस्तानी ड्रोन सुरक्षा दलाच्या जवानांनी पाडलं

सुलोचना दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमात होणार अंत्यसंस्कार

परिसरातील आणि आजूबाजूच्या व्हिडिओ फुटेजमधून या चोरीमध्ये किमान चार पुरुषांचा सहभाग दिसून येत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. मात्र एटीएमला सुरक्षारक्षक नव्हता. तसेच, आरोपींनी या औद्योगिक परिसराची रेकी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी सांगितले की, मशीन ज्या पद्धतीने उघडली गेली ते पाहून त्यांनी काही टोळ्यांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात विरार पूर्वेकडील फुलपाडा येथील एसबीआयच्या एटीएममधूनच सुमारे १७ लाख रुपयांची चोरी झाली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा