मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी म्हणजेच सुलोचना लाटकर यांनी रविवार, ४ जून रोजी सायंकाळी मुंबईतील खासगी रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. आपल्या अनेक विविधांगी भूमिकांमधून त्यांनी स्वतःची स्वतंत्र छाप पाडली होती. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, फिल्मफेअर जीवनगौरव तर २००९ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. प्रभादेवी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुलोचना दीदी यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या प्रभादेवी येथील राहत्या घरी सकाळी ११ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना दीदी यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे अशा सुचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात आपल्या सहजसुंदर अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी लाटकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तीमत्व हरपले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 4, 2023
हे ही वाचा:
अपघातानंतर बालासोर येथून ५१ तासानंतर पहिली रेल्वे निघाली, रेल्वेमंत्र्यांनी केली प्रार्थना!
सुलोचना दीदी गेल्या, चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत
बालासोर रेल्वे दुर्घटनास्थळी मदतीसाठी एकवटले शेकडो हिंदू कार्यकर्ते !
आपल्या मुलीला ‘हिरोईन’ बनवण्यासाठी आई तिला देत असे ‘हार्मोन्सच्या गोळ्या’ !
दरम्यान, साऱ्या राज्यभरातून शोक व्यक्त होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सूचना देऊन ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार आज सुलोचना दीदींना शासकीय इतमामात निरोप दिला जाणार आहे.