23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषसुलोचना दीदी गेल्या, चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत

सुलोचना दीदी गेल्या, चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत

सोज्ज्वळ, खानदानी, सरळसाध्या व्यक्तिमत्त्वाने छाप पाडली

Google News Follow

Related

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी (९४) तथा सुलोचना लाटकर यांचे रविवारी सायंकाळी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. आपल्या सालस, सरळ साध्या भूमिका, आई, पत्नी अशा भूमिकांमधून आपली स्वतंत्र छाप सुलोचना दीदी यांनी पाडली होती. ५० मराठी आणि २५० हिंदी चित्रपटांतून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या.

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने विविध भूमिका त्यांनी जिवंत केल्या होत्या. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, फिल्मफेअर जीवनगौरव तर २००९ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात मुलगी, नात, नात जावई असा परिवार आहे. श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. प्रभादेवी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

३० जुलै १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९४६ पासून सुरु केली. सासुरवास, वाहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, सांगते ऐका, लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली होती. अनेक चित्रपटांमध्ये त्यांची आईची भूमिका लोकप्रिय ठरली. हिंदी चित्रपटामध्येही देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या सोबत त्यांनी भूमिका साकारल्या. जब प्यार किसीसे होता है, प्यार मोहब्बत, दुनिया, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब, वॉरंट आणि जोशिला या चित्रपटांचा त्यात समावेश आहे.

हे ही वाचा:

बालासोर रेल्वे दुर्घटनास्थळी मदतीसाठी एकवटले शेकडो हिंदू कार्यकर्ते !

आपल्या मुलीला ‘हिरोईन’ बनवण्यासाठी आई तिला देत असे ‘हार्मोन्सच्या गोळ्या’ !

राजीनामा मागणाऱ्यांना रेल्वेमंत्र्यांनी सुनावले; ही मदत करण्याची वेळ राजकारणाची नव्हे!

साहिल नशा करणारा, गुंडांच्या टोळीशी संबंध

यासह दिल दौलत दुनिया, बहरों के सपने, डोली, कटी पतंग, मेरे जीवन साथी, प्रेम नगर, आक्रमन, भोला भला, त्याग , आशिक हूँ बहरों का आणि अधिकार, हीरा, झुला, एक फूल चार कांटे, सुजाता, मेहरबान, चिराग, भाई बहन, रेश्मा और शेरा या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांच्या जाण्याने मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. १९५९ पासून त्यांनी चित्रपटांत केलेल्या आईच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. १९९०पर्यंत त्या चरित्र भूमिकांतून आईच्या भूमिका साकारत राहिल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा