23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाआपल्या मुलीला 'हिरोईन' बनवण्यासाठी आई तिला देत असे 'हार्मोन्सच्या गोळ्या' !

आपल्या मुलीला ‘हिरोईन’ बनवण्यासाठी आई तिला देत असे ‘हार्मोन्सच्या गोळ्या’ !

वेदनेने हैराण झालेल्या मुलीने आईची तक्रार करत केली स्वतःची सुटका

Google News Follow

Related

एका आईने आपली मुलगी चित्रपटात काम करून मोठी हिरोईन बनावी या हट्टापायी तिला हार्मोन्सच्या गोळ्या खायला घालत असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या गोळ्या खाऊन मुलीच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. मुलगी अवघी १६ वर्षाची असून आई तिला चार वर्षांपासून हे औषध देत होती. वेदनांनी असहाय्य होऊन तिने गुरुवारी चाइल्डलाइनकडे तक्रार नोंदवली, त्यानंतर आंध्रप्रदेश बाल हक्क संरक्षण आयोगाने तिची सुटका केली.

 

पीडित मुलीने १६ वर्षांची असून ती अकरावीत शिक्षण घेत आहे. मुलीने आरोप केला की,माझी आई मला काही गोळ्यांचा ओव्हरडोज देत असे. ही गोळी खाल्ल्यानंतर मी बेशुद्ध व्हायचे आणि दुसऱ्या दिवशी माझ्या शरीरात बदल होऊन मला अधिक फुलल्या सारखे वाटत असे.

 

हे सर्व खूप वेदनादायक असल्याचे तिने सांगितले. त्या गोळ्या घेतल्यानंतर माझ्या शरीरावर आणि माझ्या अभ्यासावर परिणाम होत असे. आईच्या ओळखीच्या स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचा दावा करण्याऱ्या तिच्या मित्रा सोबत जवळीक साधण्यासाठी मला प्रवृत्त केले जात असे. तो व्यक्ती घरीसुद्धा आला होता, असे मुलीने तक्रारात नोंदवले आहे. आईची तक्रार करत पुढे मुलगी म्हणाली, माझी आई चित्रपट निर्देशक आणि निर्मात्यांबरोबर काम करण्यासाठी मला तयार करत होती. मी जेव्हा औषध घेण्यास नकार देत असे तेव्हा ती मला मारहाण करत असे. तसेच विजेचा शॉक देण्याची धमकी देत असे.

हे ही वाचा:

बालासोर रेल्वे दुर्घटनास्थळी मदतीसाठी एकवटले शेकडो हिंदू कार्यकर्ते !

राजीनामा मागणाऱ्यांना रेल्वेमंत्र्यांनी सुनावले; ही मदत करण्याची वेळ राजकारणाची नव्हे!

बांगलादेशातील अल्पसंख्याकांना सीएएची खरोखरच गरज आहे!

लहानेंसह अन्य डाॅक्टरांचे राजीनामे सरकारकडून मंजूर

या प्रकरणाची दखल घेत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष केशली अप्पा राव यांच्या अध्यक्षतेखालील बाल कल्याण समितीने शुक्रवारी पोलीस अधिकाऱ्यांसह मुलीच्या घरी जाऊन मुलीची सुटका केली. मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, तिचे वडील राजेश कुमार यांनी तिच्या आईला घटस्फोट दिला होता. त्यानंतर आईने दुसरे लग्न केले. काही वर्षांनंतर त्यांचा मृत्यू झाला.

 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अप्पा राव यांनी सांगितले की मुलीने प्रथम ११२ क्रमांक डायल केला, पण मदत मिळाली नाही.त्यानंतर गुरुवारी तिने दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने चाईल्डलाईन नंबर १०९८ हा क्रमांक डायल केला.आयोगाने अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे सोपवल्याचे राव यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा