31 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरविशेषदोषींना कठोर शिक्षा होईल, कुणालाही सोडणार नाही!

दोषींना कठोर शिक्षा होईल, कुणालाही सोडणार नाही!

नरेंद्र मोदी यांनी दिला इशारा आणि सखोल चौकशीचे दिले आदेश

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशा येथे झालेल्या अपघातस्थळाला भेट दिली आणि तेथील परिस्थितीची माहिती करून घेतली. त्यानंतर त्यांनी या अपघाताला जे जबाबदार आहेत, त्यांना कठोर शासन होईल, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

नरेंद्र मोदी यांनी अपघातस्थळाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले की, ही अत्यंत गंभीर घटना आहे. या अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यंत बारकाईने ही चौकशी करण्यात येईल. त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. त्यांना शिक्षा केली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने येऊन या ठिकाणाची पाहणी केली. सोबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही होते. पंतप्रधानांनी कॅबिनेट सचिव आणि आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा केली. जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ज्या गोष्टींची गरज आहे, ती सगळी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

हे ही वाचा:

राऊतांचे राजकारण थुकरट वळणावर!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओदिशात जाऊन घेतला अपघातस्थळाचा आढावा

लहानेंसह अन्य डाॅक्टरांचे राजीनामे सरकारकडून मंजूर

मुंबईत तामिळनाडूच्या हिरे व्यापाऱ्याला लुटणारी टोळी जेरबंद

आतापर्यंत या घटनेत २८८ लोकांचे प्राण गेले आहेत. तर जवळपास ९०० लोक जखमी आहेत. पंतप्रधान म्हणाले की, पीडितांच्या कुटुंबियांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जाईल. त्यांना सर्वप्रकारची मदत मिळेल याचा प्रयत्न केला जाईल.

मोदी म्हणाले की, या घटनेमुळे मला असह्य वेदना होत आहेत. ज्या नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, त्यांच्या प्रती आपल्याला पूर्ण संवेदना आहेत. जे जखमी आहेत, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सर्व सुविधा देतील. ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांना परत आणणे शक्य नाही. पण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. मी ओदिशा सरकार व प्रशासन अधिकाऱ्यांचा आभारी आहे की त्यांनी उपलब्ध सुविधांच्या माध्यमातून मदत केली. नागरिकांचेही अभिनंदन करतो. त्यांनी रक्तदान शिबिरे व इतर मदतीच्या माध्यमातून सहकार्य केले आहे. येथील स्थानिकांच्या सहकार्यामुळे हे बचावकार्य पूर्ण करता आले. रेल्वेनेदेखील आपली सगळी ताकद लावून परिस्थिती पूर्ववत होईल, यादृष्टीने प्रयत्न केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा