23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषकमल हसन म्हणतात, मी कोणत्याही चित्रपटावर बंदी घालणार नाही!

कमल हसन म्हणतात, मी कोणत्याही चित्रपटावर बंदी घालणार नाही!

द केरळ स्टोरीवरून व्यक्त केली भूमिका

Google News Follow

Related

दक्षिण चित्रपट जगतातील सुपरस्टार, ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनी ‘द केरळ स्टोरी’वरील बंदीच्या मागणीवर आपले मत प्रदर्शित केले आहे. प्रेक्षकांनी असे चित्रपट पाहताना जे दाखवले आहे, तेच खरे आहे, या ठाम समजुतीने ते पाहू नयेत, नंतर त्यावर विचार करावा, असे मत व्यक्त केले आहे. मात्र चित्रपटांवर बंदी असता कामा नये असे मतही त्यांनी व्यक्त केले.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर त्यात दाखवलेल्या धर्मांतरित स्त्रियांच्या संख्येवरून वाद निर्माण झाला. ट्रेलरमध्ये निर्मात्यांनी ३२ हजार महिलांनी इस्लामी धर्म स्वीकारल्याचे म्हटले होते. मात्र वाद अंगाशी आल्यानंतर हा आकडा तीनवर आला. त्यामुळे चित्रपटाच्या विश्वासार्हतेबद्दल संशय निर्माण झाला आणि तो चर्चेचा विषय बनला. हासन हेदेखील अप्रत्यक्षपणे याबद्दल बोलले.  

“मी हा चित्रपट पाहिलेला नाही, परंतु लोक त्याबद्दल काय बोलले हे ऐकले आहे. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अशा काही गोष्टी घडूही शकतात. मात्र संख्या वाढवणे किंवा अतिशयोक्ती करणे आणि त्याला राष्ट्रीय संकटाचे रूप देणे हे चुकीचे आहे. प्रेक्षकांनी ‘द केरळ स्टोरी’सारखे चित्रपट पाहताना ठाम समजूत करून पाहू नयेत,’ असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत २६१ जणांचा मृत्यू

अमित शहा इशारा दिल्यानंतर मणिपूरचे बंडखोर आले शरण, १४० शस्त्रे परत

साक्षी हत्याकांड एकमेव नव्हे लव्ह जिहादची काळी छाया अनेक शहरांवर

बृजभूषणविरोधातील दोन एफआयआर आणि तक्रारीत गंभीर आरोप  

‘ द केरळ स्टोरी’वर बंदी घालणार का, असे विचारले असता, ‘मी कोणत्याही चित्रपटावर बंदी घालणार नाही. त्यांना बोलू द्या. चित्रपट लोकांनी समजून घ्यावा, चित्रपटाचा उद्देश काय आहे, हे जाणून घ्यावे, यासाठी मी प्रयत्न करेन. माझ्या चित्रपटांबाबतही जेव्हा हे घडते, तेव्हा मी तेच करतो. माझ्या ‘विश्वरूपम’ चित्रपटावर तमिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यावर बंदी का घातली होती, असा प्रश्न अजूनही लोकांना पडतो.

राज कमल फिल्म्स आणि तामिळनाडू सरकार यांच्यात खटला सुरू होता. आम्ही केस जिंकली आणि चित्रपट प्रदर्शित केला. मी कोणत्याही चित्रपटावर बंदी घालण्याचे समर्थन करणार नाही,’ असे ते म्हणाले. “या देशात भाषण स्वातंत्र्य असले पाहिजे. सेन्सॉर बोर्डसारखी संस्था चित्रपट प्रमाणित करून विशिष्ट वयोगटातील व्यक्ती हा चित्रपट पाहू शकत नाहीत, असे सांगू शकतात. मात्र ‘द केरळ स्टोरी’सारखा चित्रपट प्रेक्षकांनी कोणत्याही ठाम समजुतीशिवाय पाहावा आणि त्यानंतर त्यावर विचार करावा,’ असे कमल हासन म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा