ओदिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला असून त्यात आतापर्यंत ५० लोकांचा मृत्यू आणि ४०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. अनेक लोक दगावल्याचीही भीती व्यक्त होत आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस ओदिशातील बालासोर जिल्ह्यात एका मालगाडीला धडकल्यामुळे हा मोठा अपघात घडला आहे. मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांचे तर जखमींना २ लाखांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
तूर्तास त्यात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत असली तरी अनेक लोक दगावले असण्याचीही शक्यता आहे. कोरोमंडल रेल्वे ही चेन्नई सेंट्रल आणि शालिमार (हावडा) या दरम्यान धावते. दुपारी ३.१५ वाजता या रेल्वेने शालिमार स्टेशन सोडले आणि बालासोरला ती ६.३० वाजता पोहोचली. तेव्हाच या गाडीची टक्कर मालगाडीशी झाली. सायंकाळी ७.२० वाजता हा अपघात झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे.
-Coromandel Express accident in Bahanaga, Balasore
– Coromandel Express reportedly rams into goods train
-Several passengers feared critically injured #Odisha #CoromandelExpress #TrainMishap pic.twitter.com/4TEdJEqfzN— OTV (@otvnews) June 2, 2023
हा अपघात झाल्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे १७-१८ डबे रुळावरून घसरले. त्यामुळे अनेक लोक दगावले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत जवळपास २०० लोक जखमी असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने बालासोर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सोरो येथील कम्युनिटी हेल्थ सेंटर व खांतापाडा येथील प्रायमरी हेल्थ सेंटरमध्येही जखमींना दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
बृजभूषणविरोधातील दोन एफआयआर आणि तक्रारीत गंभीर आरोप
साक्षी हत्याकांड एकमेव नव्हे लव्ह जिहादची काळी छाया अनेक शहरांवर
केरळ स्टोरीबद्दलची नसिरुद्दीन यांची भूमिका खेदजनक
राजस्थानमधील पावसाने तोडला १०० वर्षांचा विक्रम
या अपघातानंतर तिथे बचाव पथके दाखल झाली आहेत पण स्थानिकांनीही बचावकार्यात हातभार लावला आहे. डबे घसरल्यामुळे ते उलटसुलट झालेले आहेत. त्यातून लोकांना बाहेर काढण्याचे काम आता सुरू आहे. अपघात संध्याकाळी उशिरा झालेला असल्यामुळे आता मदतकार्यात अडथळे येत आहेत. तिथे पूर्णपणे अंधार आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, उपमुख्यमंत्री प्रमिला मलिक आणि सरकारी अधिकारी या सगळ्या बचावकार्यावर जातीने लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.