25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरधर्म संस्कृतीदिल्लीत शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून पंतप्रधानांना भेटणार!

दिल्लीत शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून पंतप्रधानांना भेटणार!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने घोषणा

Google News Follow

Related

छत्रपती शिवाजी महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रायगडावर शुक्रवारी ३५०व्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्त आयोजित भव्य सोहळ्यादरम्यान फडणवीस यांनी ही घोषणा केली.

 

ते म्हणाले की, या राज्याभिषेकाचे महत्त्व म्हणजे त्यामुळे आपली कालगणना बदलून नवी कालगणना सुरू झाली. शिवशकांना प्रारंभ झाला. नवी नाणी मिळाली. छत्रपतींच्या नावाने नाणी आली. हिंदूची लेखनपद्धती तयार केली. किल्ल्यांना पूर्वीची नावे दिली. त्यासोबत राज्यव्यवहारकोष मराठीत चालला पाहिजे त्यासाठी महाराजांनी प्रयत्न केले. छत्रपती संभाजीमहाराजांनीही ते प्रयत्न केले. परकीय आक्रमकांपासून मुक्ती देण्याचं काम छत्रपची शिवरायांनी केलं. सज्जनांना अभय, दुर्जनांचा कडेलोट  हेच शास्त्र छत्रपती शिवरायांनी शिकवलं. नौदलाच्या ध्वजावरील इंग्रजांची राजमुद्रा काढून शिवरायांची राजमुद्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवली आहे. यानिमित्ताने शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हायला हवं. आम्ही मावळे आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी मोदीसाहेबांकडे जाऊ आणि राष्ट्रीय स्मारक दिल्लीत झालं पाहिजे ही भावना त्यांच्यासमोर ठेवू. 

हे ही वाचा:

खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत निधी सिंगची कमाल

सायनमध्ये भरदिवसा हैदराबादच्या ज्वेलर्सचे अपहरण करून केली २ कोटींची लूट

रायगडचा इतिहास सांगणाऱ्या गाईडना पाच लाखांचा विमा

सन २०२७पर्यंत जीडीपीमध्ये भारत जगभरात अव्वल तीनमध्ये येणार

फडणवीस म्हणाले की, राज्यकारभार कसा चालवला पाहिजे याचा आदर्श शिवाजी महाराजांनी घालून दिला. कधीही कुणाची तमा बाळगली नाही. जगाच्या इतिहासात न्यायप्रिय राजे म्हणून महाराजांचे नाव नोंदविले गेले. छत्रपतींचे किल्ले स्थापत्या शास्त्राचे नमुने आहेत. त्यांनी घालून दिलेले जलसंधारणाचे धडे आम्हाला कामी येतात. वनसंवर्धनाचे धडे, त्यावेळी काढलेले आदेश आजही शिरसावंद्य आहेत. या आदेशांचे पालन केले तर पर्यावरण वाचवू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. कायद्याची, न्यायाची व्यवस्था त्यांनी केली. महिलांना संरक्षण दिलं हे लक्षात घेतलं पाहिजे याच मार्गाने चालून खऱ्या अर्थाने या स्वराज्याला सुराज्यात परिवर्तित करणार आहोत. आम्ही सगळे राज्यकारभार चालवतो आमच्या मनात प्रत्येक क्षणाला भावना असते महाराज नसते तर आपण कुठे असलो असतो. महाराजांचा अधिकृत इतिहास समोर आला पाहिजे, अशी आमचा मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री निश्चित पुढाकार घेतील.

 

फडणवीसांनी आश्वासन दिले की, रायगडाच्या संवर्धनाकरिता समिती तयार केली. लवकरच एएसआयच्या लोकांना बोलावून इथली कामे वेगाने करू. मुख्यमंत्र्यांना विनंती करतो प्रतापगडच्या प्राधिकरणाची मागणी केली आहे. मुख्यमंत्री मागणी मान्य करतील हा विश्वास आहे.

 

३५० वर्षांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने प्रमुख शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित उद्याने उभारणार आहोत तसेच भरतशेठ गोगावले यांनी शिवसृष्टीची मागणी केली आहे. त्यांनी योग्य मागणी केली आहे. त्यांच्या मागणीला माझे समर्थन आहे. मुख्यमंत्र्यांकडे मी शिवसृष्टीची शिफारस करतो.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा