26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणधानोरकर यांच्या निधनाने उमदे, लढवय्ये नेतृत्व गमावले!

धानोरकर यांच्या निधनाने उमदे, लढवय्ये नेतृत्व गमावले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Google News Follow

Related

‘तळागाळापर्यंत पोहचलेले उमदे, लढवय्ये नेतृत्व अकाली गमावले आहे, अशा शोक पूर्ण भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, पूर्वीचा एक सच्चा शिवसैनिक ते आमदार आणि खासदार म्हणून बाळू धानोरकर यांची वाटचाल जवळून पाहिली आहे. मतदार संघातील विकास कामांसाठी त्यांचा सातत्यपूर्ण असा पाठपुरावा आणि धडपड असायची. नुकतेच त्यांचे पितृछत्र हरपले होते. त्यानंतर त्यांचे असे अकाली निधन त्यांच्या कुटुंबीयांसह, कार्यकत्यांकरिता एक आघात आहे. धानोरकर कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. खासदार बाळू धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

धानोरकरांचे जाणे अस्वस्थ करणारे – अशोक चव्हाण

काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं अचानक आजारी पडणं, अत्यवस्थ होणं आणि दोन दिवसांत त्यांच्या निधनाचे वृत्त येणं, हे सारं अकल्पनीय, अविश्वसनीय व धक्कादायक आहे. राजकीय कारकिर्द बहरास येत असताना ऐन उमेदीच्या काळात त्यांचं अकाली निधन प्रत्येकाला अस्वस्थ करणारं आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले की, खासदार बाळूभाऊ धानोरकर आमचे एक सक्षम, उर्जावान सहकारी होते, संवेदनशील, कर्तव्यदक्ष व सतत कार्यमग्न असे लोकप्रतिनिधी होते. जमिनीशी नाळ जुळलेले, दांडगा जनसंपर्क आणि सार्वजनिक प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या चेहऱ्यावर सदोदित दिसणारे हास्य, आपुलकीने बोलणं नेहमी स्मरणात राहिल. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. या दुःखद क्षणी आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

हे ही वाचा:

शेवटचे तीन चेंडू धोनीने पाहिलेच नाहीत; पण जिंकल्यावर जाडेजाला उचलून घेतले

एसबीआयकडे आल्या दोन हजारांच्या १४ हजार कोटी रुपयांच्या नोटा

कॉंग्रेसचे तरुण तडफदार खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

आयपीएलविजेत्या चेन्नईवर पैशांचा पाऊस

माझ्या कुटुंबातील सदस्य गमावला – बावनकुळे

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या शोक संदेशात बावनकुळे म्हणाले की, चंद्रपूरचे तरुण खासदार आणि माझे जिवलग मित्र बाळू धानोरकर यांच्या अकस्मात निधनाने एक लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सतत जागरूक असणारे आणि प्रसंगी त्यासाठी आक्रमक होणारे धानोरकर हे असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते. हा तरुण लोकनेता आता आपल्यात नाही. हे दुःखद वास्तव स्वीकारायला मन अजूनही धजावत नाही. बाळू धानोरकर यांच्या अकाली जाण्याने मी माझ्या कुटुंबातील सदस्य गमावला आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा