दिल्लीतील गुन्हेगारीची प्रकरणे थांबण्याची चिन्ह नाहीत. आता तर एका अल्पवयीन मुलीला तब्बल ३० वेळा भोसकून ठार मारल्याची हादरवणारी घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीत एका १६ वर्षांच्या मुलीला ३० वेळा सुऱ्याने भोसकून मारण्यात आले. साहील नावाच्या या मुलाने त्या मुलीच्या घराबाहेरच तिची हत्या केली. सीसीटीव्हीत ही घटना दिसली असून त्यामुळे देशभऱात खळबळ उडाली आहे. हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा संशयही व्यक्त होत आहे.
या मुलीला हा साहील नावाचा तरुण ओळखत होता. त्यांच्या मैत्रितूनच ही घटना घडली असेल का, असा कयास लावला जात आहे. या मुलाने त्या मुलीला ३० वेळा सुऱ्याने भोसकले नंतर त्याने जवळ पडलेल्या सीमेंटच्या स्लॅबने मुलीला मारले. अनेक लोक आजूबाजूने जाताना दिसत असून त्यातील कुणीही त्या मुलीला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही.
हा खून करणारा साहील हा सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. ३०२अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शहाबाद डेअरी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. या मुलीच्या वडिलांनी ही तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा:
श्रीमंत गिर्यारोहक, व्यावसायिकीकरणामुळे एव्हरेस्ट मोहिमेत अधिक मृत्यू
मणिपूरमधील हिंसाचारात ४० दहशतवादी ठार
बहीणभाऊ बुडाल्याचे कुत्र्याच्या भुंकण्यामुळे झाले उघड
आंदोलक कुस्तीपटूंविरुद्ध दंगलीचा गुन्हा
दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी सुमन नलवा यांनी सांगितले की, आरोपी कोण आहे हे स्पष्ट झाले आहे आणि त्याला लवकरच अटक केली जाईल. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी काही पथके तयार करण्यात आली असून त्याचा शोध घेतला जात आहे.