बातमीदारीतील खोडसाळपणासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘लोकसत्ता’ या मराठी दैनिकाने पुन्हा एकदा आपला मोदीद्वेष जगासमोर उघड केला आहे. राज्याच्या टास्कफोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. शशांक जोशी यांच्या हवाल्याने लोकसत्ताने केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याची बातमी लावली. पण स्वतः डॉ. जोशी यांनीच लोकसत्ताच्या बातमीतील फोलपणा उघड केला आहे.
राज्याच्या टास्कफोर्ससे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचे आरोप केल्याची बातमी लोकसत्ताने छापली होती. या बातमीची राज्यभरात खूप चर्चा झाली. कारण केंद्र सरकारची अशी वागणूक कोविड महामारी सुरु झाल्यापासून कधीच दिसून आली नव्हती.
हे ही वाचा:
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही आता एनआयएकडे
मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाच्या जागी अजून एक मृतदेह
अमेरिकेचे संरक्षणमंत्री भारतात
लोकसत्ताने छापलेल्या या बातमीनंतर एबीपी माझा या वृत्तवाहिनीने डॉ. शशांक जोशी यांच्याशी संपर्क साधला आणि बातचीत केली. यावेळी डॉ. जोशींनी मी केंद्र सरकारवर कोणताही आरोप केला नसल्याचे स्पष्ट केले. मी केंद्र सरकार सापत्न वागणूक देत आहे असे म्हणालोच नव्हतो पण आकर्षक हेडींगसाठी अश्या गोष्टी छापल्या जात असल्याचेही डॉ. जोशी म्हणाले.
डॉ. शशांक जोशी यांनी केलेल्या पोलखोलमुळे आता लोकसत्ताचा मोदीद्वेषाचा चेहरा पुन्हा एकदा लोकांसमोर आला आहे. कोणताही धागा पकडून त्या आधारे केंद्र सरकारची आणि पंतप्रधान मोदींची प्रतिमा मालिन करण्याचा हा प्रयत्न पुन्हा उघडा पडला आहे.