28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामाकंटेनरचा ब्रेक फेल, सहा कारना धडक, १ ठार

कंटेनरचा ब्रेक फेल, सहा कारना धडक, १ ठार

पाच जण जखमी, त्यांच्यावर उपचार सुरू

Google News Follow

Related

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर २२ मे रोजी रात्री ११.१५ वाजता कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने सहा कारना धडक दिली. त्यात एक जण मृत्युमुखी पडला तर पाच जण जखमी झाले.

सदर कंटेर पुणे ते मुंबई असा प्रवास करत  असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि त्याने सहा कारना ठोकले. कंटेनरची धडक एवढी जबरदस्त होती की धडक दिलेल्या वाहनातील प्रवाशांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. त्यातील एकाचा मृत्यू झाला.

अपघात झाल्याचे समजताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा,  बोरघाट वाहतूक पॉलिसी यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, आरटीओ, लोकमान्य ॲम्बुलन्स यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी पोचली. सर्व जखमींना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले तेथे प्राथमिक उपचार करून जखमींना एमजीएम रुग्णालय पनवेल येथे हलविण्यात आले.

त्या दरम्यान हात तुटल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊन रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर असून अन्य तीन प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. सदर कंटेनर अपघात झाल्यानंतर पळविण्याचा प्रयत्न चालकाने केला. तेव्हा  बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेने पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पाठलाग करून कंटेनर अडवून चालकाला ताब्यात घेतले.

अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाल्याने सहा. पो. नि. हरेश काळसेकर, पोलीस उप निरक्षक आलोक किस्मतराव यांनी आपल्या कर्मचारी वर्गासह पोहोचून  घटनेची चौकशी सुरू केली. अपघात घडल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांनी तातडीने उपाययोजना अवलंबत बाधित वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

हे ही वाचा:

संजय राऊतांचा भूगोल कच्चा!

बुलढाण्यानजीक एसटी बस-ट्रकच्या धडकेत ८ मृत्यू

अदानी उद्योगातील गुंतवणूकदारांची तीन दिवसांत झाली चांदी

‘आपला’ तो बाब्या’ दुसऱ्या’चं ते कार्ट असं कसं चालेल?

खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी रात्री उशिरापर्यंत मदत कार्याचा आढावा घेतला. खोपोली नगरपालिका रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सतर्क करून योग्य उपचार देण्यासाठी खोपोलीचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी निर्देश दिले होते त्यामुळे प्राथमिक उपचार तातडीने होऊन जखमींना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात मदत झाली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टीमने दाखवलेल्या सतर्कतेबद्दल तहसीलदार आयुब तांबोळी यांनी कौतुक केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा