24 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरक्राईमनामापुरावे गायब करण्यासाठी फोन नष्ट केल्याची सिसोदिया यांची कबुली

पुरावे गायब करण्यासाठी फोन नष्ट केल्याची सिसोदिया यांची कबुली

मद्य घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सीबीआयने केला दावा

Google News Follow

Related

दिल्लीच्या कथित मद्यधोरण घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी दोन फोन नष्ट केल्याची कबुली आपचे नेते, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. या घोटाळ्यातील पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून सीबीआयने मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे.

मनीष सिसोदिया हे कथित दिल्ली दारू धोरण घोटाळ्यात सध्या तुरुंगात आहेत. डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने दोन मोबाइल फोन नष्ट केल्याचे कथितरीत्या सीबीआयसमोर मान्य केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात प्रथम क्रमांकाचे आरोपी असलेल्या सिसोदिया यांना सीबीआयने पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. या प्रकरणात आणि आम आदमी पार्टीला आर्थिक फायद्यांच्या बदल्यात काही मद्य व्यावसायिकांना अनुकूल धोरण आणण्यासाठी इतर आरोपींसोबत कट रचला, असा आरोप सिसोदिया यांच्यावर आहे.

तपास एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२२दरम्यान, मनीष सिसोदिया हे तीन मोबाइल हँडसेटचा वापर करत होते. सीबीआयने १९ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांचा शेवटचा फोन जप्त केला. ज्या दिवशी गृह मंत्रालयाने हे प्रकरण सीबीआयकडे पाठवले होते, त्या २२ जुलै, २०२२ पासूनच सिसोदिया हा फोन वापरत होते. त्यांनी त्यांचा जुना फोन नष्ट केला आणि नवीन वापरण्यास सुरुवात केली. मनीष सिसोदिया यांना या प्रकरणाची चौकशी होण्याची सूचना मिळाल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले, असा अधिकाऱ्यांना संशय आहे.

सिसोदिया यांनी त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनी यापूर्वी वापरलेले दोन फोन नष्ट केल्याची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास संस्था या कबुलीला सिसोदिया यांनी पुरावा नष्ट केल्याचा पुरावा मानत आहे. सिसोदिया यांच्यावर नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात या भागाचा उल्लेख करण्यात आला आहे. मनीष सिसोदिया यांनी या प्रकरणातील डिजिटल पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी फोन नष्ट केल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे, असे सूत्रांनी सांगितले.

हे ही वाचा:

समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून दिलासा !

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची काय आहेत कारणे?

निदर्शनादरम्यान पोलिसांची हत्या करणाऱ्या तिघांना इराणमध्ये फाशी

अदानी उद्योग समूहाला सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची क्लीन चिट !

अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वीच्या आरोपपत्रात सिसोदिया यांच्यावर गुन्ह्याच्या काळात डझनभर मोबाइल फोन आणि त्यातील डिजिटल पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला होता. आम आदमी पार्टीने नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत हे आरोप फेटाळून लावले आणि सीबीआय आणि ईडी भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला. मनीष सिसोदिया सध्या तिहार तुरुंगात असून त्याचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा