मुंबईतील अंधेरी येथील श्री चिनाई कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स हे नामवंत महाविद्यालय बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे. हे महाविद्यालय बंद होऊ नये यासाठी काँग्रेसची युवा शाखा ‘द नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’ (एनएसयुआय) यांच्याकडून आंदोलन केले जाणार आहे.
चिनाई महाविद्यालयाचा अनुदानित विभाग तात्काळ सुरू करावा यासाठी हे आंदोलन असणार आहे. या परिसरातील तरुणांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे एनएसयुआयचे म्हणणे आहे. गुरुवार, १८ मे रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० या वेळात आंदोलन करण्यात येणार आहे. दगडी बांधकाम, MVLU कॉलेज महाविद्यालय गेट, नागरदास रोड, अंधेरी पूर्व येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजेश शर्मा यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
१० कोटींच्या वरील कामांवर दक्षता विभाग ठेवणार वॉच
“त्र्यंबकेश्वर मंदिरामधील घुसखोरी म्हणजे मंदिरावर कब्जा करण्याचा सुनियोजित कट समजावा”
मुंबईत आजारी मुलाला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोडले चार्टर्ड विमान
एनएसयुआयचे माजी सरचिटणीस गोविंदा पांडे यांनी या आंदोलनाचे आयोजन केले असून जास्तीतजास्त लोकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.