30 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामाएकाच व्यक्तीचा फोटो वापरून ६८४ सिम कार्ड जारी

एकाच व्यक्तीचा फोटो वापरून ६८४ सिम कार्ड जारी

दूरसंचार विभागाकडून मुंबईमध्ये ३० हजार सिम कार्ड बंद

Google News Follow

Related

दूरसंचार विभागाने मुंबईमध्ये मोठी कारवाई करत तब्बल ३० हजार सिम कार्ड बंद केले आहेत. बनावट माहितीच्या आधारे हे सिम कार्ड जारी करण्यात आले असल्याने हे कार्ड बंद करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईच्या दूरसंचार विभागाने सिम कार्ड आणि त्यांच्या सबस्क्राईबर्सचा डेटाबेस तपासला असता त्यावेळी एकाच फोटोचा वापर करून वेगवेगळ्या नावांनी सिम कार्ड घेतल्याचे प्रकरण समोर आले. याबाबत सखोल तपास केला असता, अशी अनेक प्रकरणे असल्याचे ऊघडकीस आले. एका ग्रुपमध्ये कमीत कमी ५० बनावट सबस्क्राईबर दिसून आले. शिवाय अशा एकूण ६२ ग्रुपमध्ये तब्बल ८ हजार २४७ सबस्क्राईबर दिसून आले. एकाच व्यक्तीचा फोटो वापरून वेगवेगळ्या नावने तब्बल ६८४ सिम कार्ड जारी केल्याची बाब समोर आली आहे. असाच प्रकार सर्व ६२ ग्रुप्समध्ये दिसून आला. संचार साथी पोर्टलच्या लाँचसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली.

हे ही वाचा:

हिंदी महासागरात चीनचे जहाज बुडून ३९ जण बेपत्ता

१२ दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ १५० कोटींच्या कल्बमध्ये सामील!

वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाही तर १० लाखांचा दंड

मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बनावट सिम कार्डचा वापर करून अनेकदा गुन्हे घडवले जातात. दिलेली माहिती बनावट असल्यामुळे अशा व्यक्तींचा शोध घेणे सोपे नसते. यामुळेच दूरसंचार विभाग सुपर कम्प्युटरची मदत घेऊन बनावट सिम कार्डचा शोध घेत आहे. यासाठी ASTR हे टेलिकॉम सिम सबस्क्राईबर व्हेरिफिकेशन सॉफ्टवेअरही तयार करण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर एआयच्या मदतीने फेशिअल रेकिग्निशन करते. त्यामुळे बनावट सिम कार्ड ओळखणे सोपे झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा