25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषमुंबई बंदर प्राधिकरणाने २०२२- २३ मध्ये केली सर्वोच्च वाहतुकीची हाताळणी

मुंबई बंदर प्राधिकरणाने २०२२- २३ मध्ये केली सर्वोच्च वाहतुकीची हाताळणी

मुंबई बंदर प्राधिकरणाने २०२२- २३ या वर्षात ६३.६१ दशलक्ष मेट्रिक टन इतक्या सर्वोच्च वाहतुकीची हाताळणी केली

Google News Follow

Related

मुंबई बंदर प्राधिकरणाने २०२२- २३ या वर्षात ६३.६१ दशलक्ष मेट्रिक टन इतक्या सर्वोच्च वाहतुकीची हाताळणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.२१ टक्के वाढीची नोंद करण्यात आली आहे. मुंबई बंदराने केलेला वाहतुकीच्या हाताळणीचा हा आतापर्यंतचा उच्चांक असून यापूर्वी २०१६- १७ या वर्षातील ६३.०५ दशलक्ष टनांच्या सर्वोच्च कामगिरीला मागे टाकले आहे.

जवाहर द्वीपमध्ये खनिज तेलाच्या हाताळणीचा २१.८७ दशलक्ष टनांचा आतापर्यंतचा उच्चांक (२०२१-२२ मध्ये २०.५४ दशलक्ष टन), पोलादाच्या मालवाहतुकीत (३.९४ दशलक्ष टन) गेल्या वर्षीच्या तुलनेत २८.४२ टक्के वाढ, ट्रान्सशिपमेंट कार्गो (लोहखनिज, कोळसा इ.) यांच्या हाताळणीचा १४.९५ दशलक्ष टनांचा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

कोविड महामारीनंतर २०२०- २१ आणि २०२१- २२ या वर्षात कोणतीही आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजे बंदरांमध्ये दाखल झाली नव्हती. २०२२- २३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा सुरू झाल्या आणि मुंबई बंदराने २० आंतरराष्ट्रीय आणि ७१ स्थानिक क्रूझ जहाजांची हाताळणी केली. गेल्या आर्थिक वर्षात मालवाहतुकीच्या कामगिरीच्या आधारे मुंबई बंदर हे देशातील आघाडीच्या बंदरांपैकी एक म्हणून उदयाला आले आहे.

हे ही वाचा:

वज्रमुठ सुटली? नाना पटोले यांचा स्बबळाचा नारा

‘गोल्फादेवी’चा जयजयकार, समर्थ स्पोर्टसही विजेते

काँग्रेसमुळे कर्नाटकच्या डोक्यावर ६२ हजार कोटींचा ‘फुकट’चा भार वाढणार

सीबीआयने बेनामी संपत्तीवाल्यांच्या आणले नाकी ‘नऊ’

मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी व्यापार आणि इतर हितधारकांकडून बंदराला सातत्याने दिलेल्या पाठबळाबदद्ल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांना अतिशय किफायतशीर दरांमध्ये आवश्यक ती मदत आणि विकासात्मक सुविधा पुरवण्याची ग्वाही दिली आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल जलोटा यांनी सर्व बंदर कर्मचाऱ्यांच्या योगदानाची देखील प्रशंसा केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा