23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषउमेदवार मृत्यूमुखी पडली, पण मतदारांनी निवडून आणले

उमेदवार मृत्यूमुखी पडली, पण मतदारांनी निवडून आणले

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील अमरोहामधील हसनपूरच्या २५ वर्षीय आशिया बी यांना येथील लोकांना आनंदी करायचे होते. ती दयाळू आणि सर्वांशी आपुलकीने वागणारी होती. त्यामुळे तिच्या समर्थकांनी तिच्यावर विश्वास ठेवत तिलाच मतदान केले. मतदानाच्या काही दिवस आधी तिचा मृत्यू झाला आहे, हे माहीत असूनही त्यांच्या समर्थनात फरक पडला नाही. मतदारांनी तिला मतदान केलेच, शिवाय तिला जिंकूनही आणले.

नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशच्या नागरी निवडणुकीत आशिया या अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या होत्या. मात्र मतदानाच्या काही दिवस आधीच त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि २० एप्रिल रोजी फुप्फुस आणि पोटाच्या तीव्र संसर्गामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्याचा मतदारांवर फारसा परिणाम झाला नाही. जेव्हा मतांची मोजणी झाली तेव्हा आशिया जिंकली होती.

‘आशियाने सहजच मित्र जोडले होते आणि लोकांनाही तिला दिलेल्या समर्थनाचे वचन मोडायचे नव्हते,’ अशा शब्दांत स्थानिक रहिवासी मोहम्मद झाकीर यांनी भावना मांडल्या. हसनपूर नगरपालिकेत ३० पेक्षा जास्त वॉर्ड आहेत. दोन हजारांहून अधिक मतदार असलेल्या हसनपूर नगरपालिकेत वॉर्ड सदस्य (१७) या पदासाठी आशियाने १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.

‘यापूर्वी तिने कधीच निवडणूक लढवली नव्हती. मात्र, तिने लोकांच्या सेवेसाठी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. तिने त्यासाठी लोकांशी संपर्क साधला आणि तिच्या सुस्वभावी वागण्याने त्यांची मने जिंकली. दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आणि तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. निवडणुकीचा निकाल हा लोकांच्या तिच्यावर असलेल्या प्रेमाचा पुरावा आहे,’ गेल्या वर्षीच आशियाशी लग्न करणारे आणि दुधाची डेअरी चालवणारे मुनताजीब अहमद म्हणाले.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्रिपद ही वडिलोपार्जित मालमत्ता नाही’

वारकऱ्यांना राज्य सरकारकडून भेट! श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता ५ हजार विशेष गाड्या

अन्य धर्मीयांचा त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश गंभीर, एसआयटी नेमणार

‘मशिदीत पुरलेल्या कृष्णाच्या मूर्ती खोदून काढा’

स्थानिक मतदार आरिफ यानेही मतदारांची भूमिका विशद केली. ‘आशियाने तिच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी आमच्या भागात एक बैठक घेतली होती. ती नवशिकी असूनही तिच्या साधेपणाने आमच्या मनावर कायमचा ठसा उमटवला, म्हणूनच आम्ही तिला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ती आता नाही, पण तिला लोकांप्रती कायम कळवळा होता. त्यासाठी ती कायम लक्षात राहील. आमची मते, ही तिला श्रद्धांजली आहे.’ अर्थात आशिया विजयी झाली असली तरी तिथे नियमानुसार पुन्हा निवडणूक घेतली जाणार आहे. ‘आम्हाला प्रक्रियेचे पालन करावे लागेल. आता त्याच पदासाठी पुन्हा मतदान होणार आहे,’ अशी माहिती हसनपूरचे उपविभागीय दंडाधिकारी अशोक कुमार यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा