सध्या तरुणांमध्ये रील्स बनवण्याची क्रेझ आली आहे. मात्र त्यासाठी तरुण वाटेल त्या थराला जात असल्याचे नुकत्याच एका घटनेवरून समोर आले आहे. चांगले रील्स बनवण्यासाठी त्या एडिट कराव्या लागतात. मात्र त्यासाठी लॅपटॉप लागतो. मात्र लॅपटॉप नसल्याने दोन तरुणांनी ग्राहक सेवा केंद्रालाच लक्ष्य करून तिथून लॅपटॉपची चोरी केल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून ही चोरी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
तरुण पिढीला रील्स बनवण्याचा जणू छंदच लागला आहे. शिवाय या रील्सना अधिकाधिक व्ह्यू आणि लाइक्स मिळावेत, यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घ्यायलाही काही तरुण मागेपुढे पाहात नाहीत. झारखंडमधील जामताडा भागातून असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.
येथील दोन तरुणांना रील्स बनवण्यासाठी लॅपटॉप हवा होता. व्हिडीओ शूट केल्यानंतर तो चांगला एडिट करण्यासाठी त्यांच्याकडे कम्प्युटर नव्हता. त्यामुळे त्यांनी ग्राहक सेवा केंद्राला लक्ष्य करून चोरी केल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांपूर्वी पांडेडीह येथील ग्राहक सेवा केंद्राचे कुलूप तोडून तेथील लॅपटॉप आणि काही पैशांची चोरी झाल्याचे उघडकीस आले.
हे ही वाचा:
नवऱ्याने वऱ्हाडींसाठी चिकनचा धरला आग्रह आणि लग्न मोडले, वधूने मग धडा शिकवला!
भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसच्या प्रतिस्पर्ध्यावर मिळविला अवघ्या १६ मतांनी विजय
‘द केरळ स्टोरी’ बघण्यासाठी थिएटर तुडुंब, जमवला ११२ कोटींचा गल्ला
पिवळ्या रंगाच्या साडीतील परिणिती आणि काकांनी डिझाईन केलेल्या वेषात राघव
केंद्रचालक सकाळी पोहोचल्यानंतर चोरी झाल्याचे कळले. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यात दोन तरुण चोरी करत असल्याचे उघडकीस आले. यातील चोरांना गावकऱ्यांनी ओळखल्यानंतर त्यांना पकडण्यात आले. त्यांना बेदम मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दोन्ही तरुणांची नावे हसनैन अन्सारी आणि अरशद अन्सारी अशी असून ते दोघे बोरोटांड गावचे रहिवासी आहेत. चौकशीत त्यांनी रील्स एडिट करण्यासाठी लॅपटॉपची गरज होती आणि त्यासाठी चोरी केल्याचे कबूल केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.