22 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरक्राईमनामा'भारत पे'चे माजी प्रमुख अशनीर ग्रोव्हर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

‘भारत पे’चे माजी प्रमुख अशनीर ग्रोव्हर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

'भारत पे'चे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ

Google News Follow

Related

‘भारत पे’चे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीच्या आरोपाखाली अशनीर ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध नवा गुन्हा दाखल केला आहे.

इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगने (EOW) अशनीर ग्रोव्हर, त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर, दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांविरुद्ध ८१ कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. ‘भारत पे’च्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे.

अशनीर ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबीयांवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. ८१ कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

हे ही वाचा:

स्पॅम कॉल्सवरून भारत सरकारने दिला व्हॉट्सअपला दिला इशारा

एलन मस्क ‘ट्विटर’च्या सीईओपदाचा राजीनामा देणार

बॉडी बिल्डर संकल्प भाटकरला आईच्या हत्येप्रकरणी अटक

डी – कंपनी एनआयएच्या रडारवर 

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षभरापासून हे प्रकरण चर्चेत आहे. यापूर्वी अशनीर ग्रोव्हर यांनी कोटक बँकेच्या कर्मचार्‍यांशी केलेल्या गैरवर्तनाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये माधुरी जैन यांना फसवणुकीच्या आरोपावरून कंपनीतून काढून टाकण्यात आले. पुढे अशनीर ग्रोव्हरने १ मार्च २०२२ रोजी कंपनीच्या पदाचा राजीनामा दिला. अशनीरच्या पत्नीने कंपनीच्या फंडातील पैसे स्वतःच्या खासगी गोष्टींसाठी खर्च केल्याचा आरोपही कंपनीने केला होता.

फिनटेक युनिकॉर्न भारत पे आणि अश्नीर ग्रोव्हर यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद सुरू आहे. अशनीर ग्रोव्हरवर यांच्यावर गेल्या सहा महिन्यांत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा गैरवापर, विश्वासघात, साक्षीदार नष्ट करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा