24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरदेश दुनियामोदींवर आरोप झाले,आता पाकिस्तानातील जाळपोळ रा.स्व. संघ, भाजपाने केल्याचा दावा

मोदींवर आरोप झाले,आता पाकिस्तानातील जाळपोळ रा.स्व. संघ, भाजपाने केल्याचा दावा

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे विशेष सहाय्यक अत्ता तरार यांचे अजब तर्कट

Google News Follow

Related

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून अटक केल्याने देशभरात अशांतता आणि अराजकता निर्माण झाली आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने पाठवलेले लोक पाकिस्तानमध्ये तोडफोड आणि जाळपोळ करत आहेत, असा अजब दावा पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे विशेष सहाय्यक अत्ता तरार यांनी केला आहे.

‘माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेविरोधात त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर धडकले. हे मूठभर लोक भाजप आणि आरएसएसशी संबंधित आहेत. जे तोडफोड आणि जाळपोळ करत आहेत, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने पाठवलेले लोक आहेत. पाकिस्तानमध्ये निदर्शने झाल्यानंतर भारतात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप आणि आरएसएसने याचा आनंदोत्सव साजरा केला. भारतात मिठाई वाटली गेली,” असा दावा त्यांनी केला. ‘काल जे काही झाले ते आरएसएसच्या सांगण्यावरून होते,’ असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

आम्हाला घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना न्यायालयाने कालबाह्य केले!

“सरकार घटनाबाह्य असल्याच्या बाष्कळ बाता ठाकरेंनी बंद कराव्यात”

आता महाभारत येणार १० भागांत, राजामौली लिहिणार पटकथा

गद्दारांच्या मागणीचा मी का विचार करू म्हणून दिला राजीनामा!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख (पीटीआय) इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून अटक केल्याने देशभरात अशांतता निर्माण झाली असून ठिकठिकाणी हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांनी रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावर टायरची जाळपोळ केली. विटा फेकल्या, तर काहींनी मुख्य प्रवेशद्वारावर दगड आणि विटांचा मारा केला.

इस्लामाबाद, लाहोर, कराची, पेशावर आणि देशभरातील इतर प्रमुख शहरांमध्ये समर्थकांनी मुख्य महामार्गही रोखले. इम्रानच्या समर्थकांचा राग लष्करी आस्थापना, त्यांची कार्यालये, घरे आणि प्रतिष्ठानांवर अधिक होता. त्यांनी रावळपिंडी येथील लष्कराचे मुख्यालय, लष्करी नियंत्रण असलेले क्षेत्र, लाहोरमधील कॉर्प्स कमांडरचे निवासस्थान आणि इतर लष्करी व्यवस्थापित क्षेत्राकडे कूच करण्यास सुरुवात केली. लाहोरमध्ये पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि कॉर्पस कमांडरच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा