पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना काल, ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात प्रचंड हिंसाचार उसळला आहे. विविध शहरांमध्ये इम्रान खान यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पाकिस्तानात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.
इस्लामाबादमध्ये जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. रावळपिंडीच्या लष्करी मुख्यालयामध्येही आंदोलक घुसले असून पेशावर, फैजलाबाद, क्वेट्टा या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संपूर्ण पाकिस्तानात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच ट्विटर, फेसबुक आणि यूट्युब सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
हे ही वाचा:
ईडी म्हणते, ‘मनी लाँड्रिंग प्रकरणात परब यांची चौकशी आवश्यक’
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात ५० लाख डॉलर्सचा दंड
कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान, कर्नाटकमधील ‘हा’ समज बदलणार?
८६ वर्षीय डॉक्टरची नोकराने केली हत्या
मंगळवारी इम्रान खान हे लाहोरहून इस्लामाबादला आले होते. एका खटल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयात त्यांची ‘बायोमॅट्रिक’ माहिती जमा केली जात असतानाच पाकिस्तानी रेंजर्स या निमलष्करी दलाचे जवान काच तोडून आत घुसले आणि त्यांनी खान यांना अटक केली. ‘अलकादिर ट्रस्ट केस’ प्रकरणात इम्रान खान यांना अटक झाल्याची माहिती आहे.