25 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरराजकारणधर्मांतराकडे डोळेझाक करणाऱ्या आव्हाडांना लाज वाटली पाहिजे!

धर्मांतराकडे डोळेझाक करणाऱ्या आव्हाडांना लाज वाटली पाहिजे!

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी फटकारले

Google News Follow

Related

दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट वादाच्या गर्तेत अडकला होता. मात्र, प्रदर्शित झाल्यावर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे. मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त घोषित करण्यात आला. त्यानंतर इतरही राज्यांमधून हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करण्यात येत होती.

याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटामुळे केरळची प्रतिमा डागळली गेली सोबतच राज्यातील महिलांचा अपमान झाल्याने चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात यावी, असे बेफाम विधान केले. त्यावर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी घणाघात केला आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यास चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातून मांडलेला धर्मांतरासारखा मुद्दा सत्य घटनेकडे डोळेझाक करणा-या जितेंद्र आव्हाडांना गंभीर वाटत नसेल तर त्यांनाच लाज वाटायला पाहिजे. त्या पुढे म्हणाल्या, जितेंद्र आव्हाड यांच्या आत्तापर्यंतच्या भूमिका यात खतपाणी घालणा-याच आहेत. मुळात त्यांना एवढा पुळका येण्याचं कारण समजू शकते. त्यांची रोजीरोटी याच वोट बॅंकेवरच चालते पण वोट बॅंकच्या नादात तुम्ही ‘मुंब्र्याचा छोटा पाकिस्तान’ तयार करण्याचं पाप केलंय हे पण विसरू नका.

पश्चिम बंगालमध्ये ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानिमित्ताने चित्रा वाघ यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वर नेम साधला. चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या, मोठी बहीण, बंगालमध्ये द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घालून तुम्ही सत्य लपवू शकत नाही! ही हुकुमशाही आहे आणि तुमची धर्मांतराची विचारसरणी उघड करते! लोकांना काय पाहायचे आहे आणि काय नाही हे तुम्ही ठरवू शकत नाही! पण मला माहित आहे की तुम्हाला कशाची भीती सतावत आहे, सत्य हे आहे की केरळमध्ये जे घडले तेच बंगालमध्ये घडते आहे! ही भीती तुम्हाला कुठेतरी सतावत आहे. ‘द बेंगाल स्टोरी’ समोर आल्यावर तुमचा रागीट चेहरा उघड होईल!

इंटरनेट, डिजिटल क्षेत्रात आशियामध्ये पाकिस्तानने तळ गाठला!

धक्कादायक!! इराणमध्ये यावर्षी २०३ जणांना फासावर लटकवले!

‘चॅटजीपीटी’चा पहिला बळी; चीनमध्ये खोट्या अपघाताची बातमी करणाऱ्याला अटक

थॅलियम, आर्सेनिक देऊन पती, सासूला मारणाऱ्या महिलेला जामीन नाही

सध्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात “हिंदू सकल समाज” च्या सदस्यांनी चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे.मात्र, या चित्रपटाला काही नेत्यांकडून विरोध देखील होत आहे. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवार, ६ मे रोजी चित्रपटाला करमुक्त जाहीर केले. उत्तर प्रदेशमध्ये ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा करमुक्त करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा