27 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरविशेषमेक इन इंडियाची भरारी!! पहिले एअरबस C295 भारताच्या ताफ्यात येणार

मेक इन इंडियाची भरारी!! पहिले एअरबस C295 भारताच्या ताफ्यात येणार

The first Airbus C295 will enter India's fleet

Google News Follow

Related

भारतासाठी पहिल्या एअरबस C295 ने सोमवार, ८ मे रोजी आपले पहिले उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. या विमानाने स्पेनमधील सेव्हिल येथून ५ मे रोजी स्थानिक वेळेनुसार ११.४५ वाजता उड्डाण केले आणि तीन तासांच्या उड्डाणानंतर १४.४५ ला उतरले. त्यामुळे २०२३ च्या उत्तरार्धात अन्य विमाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

“C295 चे पहिले यशस्वी उड्डाण हा पहिल्या मेक इन इंडिया एरोस्पेस कार्यक्रमासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा टप्पा आहे. भारतीय वायुसेना C295 चे जगातील सर्वात मोठे ऑपरेटर बनणार आहे. हा कार्यक्रम भारतीय वायुसेना (IAF) ऑपरेशनल सुधारण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे आणि क्षमतेचे उदाहरण आहे,” असे एअरबस डिफेन्स अँड स्पेसमधील मिलिटरी एअर सिस्टिमचे प्रमुख जीन- ब्राइस ड्युमॉन्ट म्हणाले.

भारतीय वायू दलासाठी महत्त्वाची असणाऱ्या लेगसी AVRO ची जागा घेण्यासाठी भारताने सप्टेंबर २०२१ मध्ये ५६ C295 विमाने विकत घेतली.

यानुसार, १६ विमाने स्पेनमधील सेव्हिल येथे असेंबल केली जातील आणि ‘फ्लाय-अवे’ स्थितीत दिली जातील. उर्वरित ४० विमाने दोन्ही कंपन्यांमधील औद्योगिक भागीदारीचा भाग म्हणून टाटा प्रगत प्रणालीद्वारे (TASL) भारतात तयार आणि असेंबल केली जातील.

हलक्या आणि मध्यम विभागातील या नवीन पिढीतील विमाने भारताची लष्करी ताकद वाढवून चीन आणि पाकिस्तानला धडकी भरवणारी ठरणार आहेत.

हे ही वाचा:

सागरी जगभ्रमणासाठी आता मोहिमेवर निघणार नौदलाची महिला अधिकारी

‘द केरळा स्टोरी’ला विरोध करणारे आयसीसचे समर्थक

गंमतच आहे सगळी!! मुक्त पत्रकारितेच्या बाबतीत अफगाणिस्तान भारतापेक्षा सरस

घरावर मिग- २१ विमान कोसळून दोघांचा मृत्यू

गेल्या ऑक्टोबरमध्ये C295 फायनल असेंमबली लाइनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये उद्घाटन करण्यात आले. खाजगी क्षेत्रातील, हा पहिलाच मोठ्या प्रमाणात मेक-इन-इंडिया संरक्षण कार्यक्रम आहे. तसेच, संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत भारतीय कंपन्यांच्या स्वदेशी क्षमता विकसित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा