23 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरदेश दुनियालष्करी परेडवर केलेल्या हल्ल्याबद्दल तेहरानमध्ये इराणी-स्विडिश नागरिकाला फाशी

लष्करी परेडवर केलेल्या हल्ल्याबद्दल तेहरानमध्ये इराणी-स्विडिश नागरिकाला फाशी

युरोपियन युनियन, स्वीडन. फिनलंड, नॉर्वेकडून फाशीचा निषेध

Google News Follow

Related

इराणने शनिवारी एका इराणी-स्वीडिश नागरिकाला फाशी दिली. सन २०१८मधील लष्करी परेडवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा आरोप त्याच्यावर होता. या हल्ल्यात २५ जण मारले गेले होते.

पाश्चिमात्य देश आणि इराणमध्ये तणावाची परिस्थिती असताना इराणच्या अनेक शत्रूंपैकी एक असणाऱ्या नेत्याला पकडण्यात आले. ‘फाशी देण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव फराजोल्लाह चाब उर्फ हबीब असयुद असे असून तो ‘अरब स्ट्रगल मूव्हमेंट फॉर द लिबरेशन ऑफ अहवाझ’ या अरब फुटीरतावादी चळवळीचा नेता म्हणून ओळखला जातो. ज्या संघटनेने इराणच्या तेल समृद्ध खुजेस्तान प्रांतात तेलाच्या पाइपलाइनमध्ये बॉम्बस्फोट घडवून इतरही हल्ले केले होते. त्या गटाने २०१८चा हल्ला घडवून आणल्याचा दावा केला होता.

इराकबरोबरचे युद्ध संपल्यानंतर इराणमध्ये १९८८मध्ये सामूहिक फाशी घडवण्यात आली होती. त्यामध्ये भाग घेतल्याबद्दल स्वीडिश न्यायालयाने गेल्या वर्षी एका इराणीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. पाश्चिमात्य देशांशी वाटाघाटी करण्यासाठी कैद्यांचा वापर करणाऱ्या इराणने याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर इराणने चाब याला फाशी दिल्यामुळे पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली आहे. इराणच्या न्यायसंस्थेच्या मिझान वृत्तसंस्थेने चाब याला फाशी दिल्याचे म्हटले आहे.

इराणी सरकारने चाब याच्यावर अतिरेकी गटाचा नेता असल्याचा तसेच, स्वीडिश, इस्रायली आणि अमेरिकेच्या गुप्तचर सेवांशी त्याचे संबंध असल्याचा पुरावा न देता आरोप केला. त्यात त्याच्या गटावर गेल्या काही वर्षांत सुमारे ४५० लोकांना ठार मारण्याचा किंवा जखमी केल्याचा आरोपही आहे.

हे ही वाचा:

जंतरमंतरची वाटचाल शाहीन बागेकडे

दिल्लीत हुक्का बारमध्ये १७ वर्षीय तरुणाला घातली गोळी

ऑनलाइन घोटाळे करण्यासाठी केली होती एक हजार लोकांची तस्करी

जंतरमंतरची वाटचाल शाहीन बागेकडे

स्वीडनचे परराष्ट्र मंत्री टोबियास बिलस्ट्रॉम यांनी चाब याच्या फाशीचा निषेध केला. ‘मृत्यूची शिक्षा ही एक अमानवीय आणि अपरिवर्तनीय शिक्षा आहे आणि स्वीडन, युरोपियन युनियनसह सर्व देश कोणत्याही परिस्थितीत त्याच्या वापराचा निषेध करतो,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. फिनलंड आणि नॉर्वेनेही या फाशीचा निषेध केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा