22 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरधर्म संस्कृतीबजरंग दल करणार सामुहिक हनुमान चालीसा पठण

बजरंग दल करणार सामुहिक हनुमान चालीसा पठण

कर्नाटक विधानसभेच्या आदल्या दिवशी ९ मे रोजी राज्यात व देशभरात आयोजन

Google News Follow

Related

कर्नाटक व छत्तीसगड सरकारने बजरंगदलासारख्या देशभक्त संघटनेवर बंदी घालण्याची भाषा केली आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवार ९ मे रोजी बजरंग दलाकडून सामूहिक हनुमान चालीसा पठण आयोजित करण्यात आले आहे. हे सामुहिक पठण कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या आदल्या दिवशी करण्यात येणार आहे.

केवळ मुस्लिम लांगुलचालनासाठी पीएफआयसारख्या अराष्ट्रीय व दहशतवादी संघटनेशी बजरंगदलासारख्या देशभक्त संघटनेची तुलना केली आहे. हे विहिंप तसेच समस्त हिंदु समाज कदापि खपवून घेणार नाही. त्याच्या निषेधार्थ येत्या मंगळवार ९ मे रोजी देशभरात तसेच महाराष्ट्रात सामुहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी म्हटले आहे.

मंगळवार ९ मे रोजी बजरंग दलाचे ३४ लाख कार्यकर्ते देशभर सामूहिक ‘हनुमान चालिसा’ पठण कार्यक्रम करतील, असे महामंत्री महामंत्री मिलिंद परांडे यांनी सांगितले. ‘काँग्रेसने कर्नाटक, छत्तीसगड आणि बिहारमध्ये बजरंग दलावर बंदी घालण्याची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रातही आमदार अशोक चव्हाण यांनी ही भूमिका व्यक्त केली आहे. निवडणूक असल्याने मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण व्हावे म्हणून ही मंडळी अशा प्रकारची वक्तव्ये करीत असतात. त्यांनी निवडणुकीपूर्वी विषय काढल्याने निवडणुकीपूर्वी म्हणजे ९ मे रोजी हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनी विषय छेडला हे त्यांचे दुर्दैव असे परांडे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

मोचा चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी विशेष विमान होणार रवाना

तामिळनाडूच्या थिएटर मालकांकडून ‘द केरळ स्टोरी’ला मनाई

सुवर्ण मंदिराजवळ स्फोट, काचा लागून अनेक भाविक जखमी

समाज जीवनात अनेक सार्वजनिक कार्यक्रम सुरू असतात. मतदानाच्या दिवशी मृत्यू होतात. किंवा अन्य घरगुती सोहळे होतात. त्याचा आचारसंहितेशी संबंध नाही. समाज जीवनात ‘हनुमान चालिसा पठण’ हा नियमित कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे कर्नाटकात कोणताही आचारसंहिता भंगाचा प्रश्न येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. देशभक्तांच्या बजरंग दलाची तुलना देशविघातक कारवाया करणाऱ्या ‘पीएफआय’शी करण्याचा काँग्रेसने केलेला प्रयत्न निषेधार्ह असल्याचे सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा