ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांशी संवाद साधला. सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत उद्धव ठाकरेंनी यावेळी ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. लोकांचा विरोध असल्यास रिफायनी होणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा डाव आखला जात आहे. मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही, उद्धव ठाकरे म्हणाले. लोकांचा रिफायनरीला विरोध असल्यास ती होऊ देणार नाही. हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले. मी मन की बात करायला आलो नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
रिफायनरी गुजरातला न्या आणि आमचा एअर बस, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणा. वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्रात आणि चांगले प्रकल्प गुजरातला गेले. हे चालणार नाही. रांगोळी गुजरातला आणि राख महाराष्ट्राला हे योग्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची ३३ देशांमध्ये गद्दार म्हणून ओळख झाली आहे. या गद्दारांना महाराष्ट्रातील तीन जिल्हे देखील ओळखत नव्हते. समृद्धी महामार्ग होताना देखील मार्ग काढला अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा नष्ट होत होत्या, मी जाऊन मार्ग काढला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
काश्मीरमधील अपघातानंतर ध्रुव हेलिकॉप्टरचे उड्डाण थांबवले
दहशतवादावरून जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला सुनावले
‘द केरळ स्टोरी’ला विरोध म्हणजेच काँग्रेसचे दहशतवादाला समर्थन
अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेच्या बाता मारणाऱ्या पाकिस्तानमध्ये ५० हिंदूंचे धर्मांतर
दरम्यान, नाणारमधील प्रकल्प बारसूला हलविण्याची मागणी करणारे पत्र उद्धव ठाकरे यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. त्यामुळे आता बारसूवासियांच्या विरोधाला समर्थन द्यायला उद्धव ठाकरे मैदानात उतरल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.