भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरज याने दोहा येथील डायमंड लीग स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे. दोहा येथील कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्रा याने बाजी मारली असून त्याने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर दूर भाला फेकला. ग्रेनाडामधील अँडरसन पीटर्स याने मागील वर्षी ९३.०७ मीटरच्या थ्रोसह स्पर्धा जिंकली होती. यंदा त्याला नमवून नीरज चोप्राने बाजी मारली आहे.
नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावत या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. नीरजने या स्पर्धेत ८८.६७ मीटर लांब भाला फेकून स्पर्धा जिंकली. नीरजने गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अँडरसन पीटर्सकडून झालेल्या पराभवाचा हिशोब चुकता केला आहे. या कामगिरीनंतर नीरज चोप्रावर सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राचा खेळ
पहिला प्रयत्न – ८८.६७ मीटर
दूसरा प्रयत्न – ८६.०४ मीटर
तिसरा प्रयत्न – ८५.४७ मीटर
चौथा प्रयत्न – —
पाचवा प्रयत्न – ८४.३७ मीटर
सहावा प्रयत्न – ८६.५२ मीटर
हे ही वाचा:
दहशतवादावरून जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला सुनावले
‘द केरळ स्टोरी’ला विरोध म्हणजेच काँग्रेसचे दहशतवादाला समर्थन
अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेच्या बाता मारणाऱ्या पाकिस्तानमध्ये ५० हिंदूंचे धर्मांतर
दिलासा.. कोरोनाची उतरती भाजणी सुरु
दोहा डायमंड लीगची अंतिम आकडेवारी
नीरज चोप्रा (भारत) – ८८.६७ मीटर
जॅकब वडलेज्च (चेक गणराज्य) – ८८.६३ मीटर
अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) – ८५.८८