घरगुती वादातून पतीने पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून दिले ,त्यानंतर स्वतःला पेटवून घेतल्याची घटना गुरुवारी रात्री धारावीतील नाईक नगर येथे घडली .या जाळपोळीत गंभीररीत्या जखमी झालेल्या दाम्पत्याचा सायन रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटने प्रकरणी धारावी पोलिसांनी पती विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
अनिल धुरीया (२६)आणि प्रिया धुरिया (२५)असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.अनिल धुरिया हा पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांसह धारावीतील नाईक नगर येथे राहण्यास होता. जवळच अनिल धुरिया याचे आई वडील राहण्यास आहे. अनिल धुरिया किरकोळ कामधंदा करीत होता, तर प्रिया हि घरकाम करून पतीला हातभार लावत होती. अनिल धुरिया याला दारूचे भयंकर व्यसन होते, दारूच्या नशेत अनिल हा दररोज घरात भांडणे करून पत्नीला मारहाण करीत असे.
गुरुवारी रात्री अनिल हा दारूच्या नशेत घरी आला व त्याने पत्नीसोबत भांडण करण्यास सुरुवात केली, दोघांचे भांडण विकोपाला जाऊन अनिल याने घरात असलेलले रॉकेल पत्नीच्या अंगावर ओतून तीळ पेटवून दिले, त्यानंतर स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतले, या जाळपोळीत दोघेही गंभीररीत्या भाजले, शेजाऱ्यांनी आग विजवून दोघांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने धुरिया दाम्पत्याची दोन्ही मुले आजीआजोबाकडे असल्यामुळे दोघेही या बचावले. याघटनेची माहिती मिळताच धारावी पोलीसानी रुग्णालयात धाव घेऊन पत्नी प्रिया हीचा जबाब नोंदवून घेत पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा:
दहशतवादावरून जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला सुनावले
जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्यावर सीबीआयचे छापे
टिपू सुलतानच्या अत्याचारांचे वास्तव दर्शन; लवकरच येतोय ‘टिपू’
‘द केरळ स्टोरी’ला विरोध म्हणजेच काँग्रेसचे दहशतवादाला समर्थन
या जाळपोळीत गंभीररीत्या भाजलेल्या या दाम्पत्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी सकाळी दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्ह्यात वाढ करून पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ घरगुती वादातून झालेल्या भांडणातुन हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.