25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामापाकिस्तानमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ शिक्षकांचा मृत्यू

पाकिस्तानमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ शिक्षकांचा मृत्यू

सशस्त्र हल्लेखोरांनी शाळेच्या स्टाफ रूममध्ये घुसून केला गोळीबार

Google News Follow

Related

पाकिस्तानमधील परचिनार येथील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. खैबर पख्तुनख्वामध्ये गुरुवारी हा हल्ला झाला. सशस्त्र हल्लेखोरांनी शाळेच्या स्टाफ रूममध्ये घुसून गोळीबार केला. मृतांपैकी ४ शिया समुदायाचे आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. अलीकडच्या काळात खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे.

हा दहशतवादी हल्ला खुर्रम जिल्ह्यातील टेरी मंगल हायस्कूलमध्ये झाला आहे. हे हल्लेखोर एका कारमधून आले. शाळेच्या बाहेर बॅरिकेट्स लावून पोलिसांचा पहारा असताना देखील हे हल्लेखोर बॅरिकेट्स तोडून आत घुसले. हल्लेखोर थेट शाळेच्या स्टाफरूमच्या दिशेने गेले. स्टाफरूममध्ये त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला.त शाळेच्या स्टाफ रूममध्ये शिक्षक परीक्षेच्या प्रश्चपत्रिका तयार करत असतांना हा अचानक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ७ शिक्षक ठार झाले. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर आलेल्या कारमधून पलायन करण्यात यशस्वी झाले. हल्ल्यानंतर पुढच्या आठवड्यापासून सुरु होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील आठवड्यापासून येथे सुरू होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान सोबत सरकारचा संघर्ष संपल्यानंतर दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी तीव्र निषेध केला आहे. शिक्षकांवरील हल्ला निंदनीय आहे. त्याच्या हल्लेखोरांना लवकरच अटक करून त्यांना कायद्यानुसार शिक्षा केली जाईल असे राष्ट्रपती अल्वी यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हा दशतवाडी हल्ला होता कि आपसातील दुश्मनीमुळे करण्यात आला हे अद्याप समजू शकलेले नाही. परिसरात पोलीस आणि लष्कराचे जवान तैनात करण्यात आले असून हल्लेखोरांच्या शोधासाठी छापे टाकण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

सर्बिया पुन्हा हादरले!! गोळीबाराच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री तब्बल १२ वर्षांनी भारतात, केली होती ‘ही’ भारताविरोधात वादग्रस्त विधानं

दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प, हजारो भाविक अडकले

पवारांनी सांगितले आणखी १-२ दिवस थांबा!

खैबर भागात आणखी एक दहशतवादी हल्ला झालेला असून यामध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या पाकिस्तानी जवानांनी ६ सैनिकांची हत्या केली आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील या खुर्रम भागातील दिरदोनी येथे हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला कोणी केला हे अद्याप सजू शकलेले नसून या हल्ल्याची जबादारी देखील अद्याप कोणी स्वीकारलेली नाही. हल्ल्यानंतर दहशतवादीही आरामात पळून जाण्यात यशस्वी झाले. लष्कराने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. याच भागात दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने अब्दुल जब्बार शाह या तालिबानी म्होरक्याला ठार केले होते. यानंतर तालिबानने बदला घेण्याची धमकी दिली. त्यामुळेच तालिबानने पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केल्याचे मानले जात आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा