25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामासंरक्षण संशोधन तथा डीआरडीओचा शास्त्रज्ञ अडकला हनी ट्रॅपमध्ये

संरक्षण संशोधन तथा डीआरडीओचा शास्त्रज्ञ अडकला हनी ट्रॅपमध्ये

पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी ऑनलाइन आला संपर्कात

Google News Follow

Related

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ‘डी. आर. डी. ओ.’ चे शास्त्रज्ञ यांनी पुणे येथील त्यांचे कार्यालयामध्ये शासकीय कर्तव्य बजावित असताना भारताचे शत्रू राष्ट्रांतील पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह ( PIO) चे हस्तक यांचेशी सोशल मिडिया च्या माध्यमातून व्हॉटअपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडिओ कॉलने संपर्कात राहिले आणि जाळ्यात सापडले.

डी. आर. डी. ओ. चे शास्त्रज्ञ यांनी धारण केलेल्या पदाचा गैरवापर करत कर्तव्यावर असताना त्यांचे ताब्यात असलेले संवेदनशील शासकिय गुपिते जी शत्रु राष्ट्राला मिळाल्यास भारत देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहचू शकतो, अशी माहिती अनाधिकृतरित्या शत्रु राष्ट्रास पुरविली आहे.

त्याबाबत दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य पोलीस ठाणे, काळाचौकी, मुंबई गु.र.न. ०२/२०२३ शासकीय गुपीते अधिनियम १९२३ कलम ०३ (१) (क), ०५(१)(अ), ०५ (१) (क), ०५ (१) (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढिल तपास प्रभारी पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे युनिट हे करीत आहेत.

हे ही वाचा:

मी दिलेला सल्ला शरद पवारांच्या पचनी पडेल का? उद्धव ठाकरे यांनी मारला टोमणा

लोक नाहीत सांगाती….

लष्कराचे हेलिकॉप्टर चिनाब नदीत कोसळले

पवारांनी सांगितले आणखी १-२ दिवस थांबा!

शास्त्रज्ञला अटक करण्यात आली असून प्रदीप कारूळकर असे अटक करण्यात आलेल्या शास्त्रज्ञचे नाव आहे. पुण्यातील डीआरडीओच्या एका युनिटमध्ये कार्यरत असलेल्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञाला एटीएसने हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे.  त्याने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या कार्यकर्त्यांशी व्हॉट्सऍप संदेश, व्हॉईस कॉल, व्हिडिओ इत्यादीद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधल्याचे आढळून आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा