जम्मू- काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील मछना गावाजवळ लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला आहे. हेलिकॉप्टर येथील चिनाब नदीत कोसळलं असून हेलिकॉप्टरमध्ये तीन अधिकारी असल्याची माहिती आहे. अपघातस्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
‘जम्मू- काश्मीरच्या किश्तवारजवळ लष्कराचे ALH ध्रुव या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. अपघातात पायलट जखमी झाले असून त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही. तसेच पुढील तपास देखील सुरू आहे,’ अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
An Army ALH Dhruv Helicopter crashed near Kishtwar, Jammu & Kashmir. Pilots have suffered injuries but are safe. Further details awaited: Army Officials. pic.twitter.com/ya41m7CRfn
— ANI (@ANI) May 4, 2023
हे ही वाचा:
मुंबईतील बिबटे माणसांसोबत जीवन जगू शकतील का?
‘गो फर्स्ट’च्या वैमानिकांची एअर इंडिया, इंडिगोच्या ‘कॉकपिट’वर नजर
सर्बियात १३ वर्षांच्या मुलाने शाळेत आठ मुलांना घातल्या गोळ्या
अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराची आणखी एक घटना; एक ठार
खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांत गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पाऊसही पडत आहे. त्यामुळे हा अपघात खराब हवामानामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.