पुणे शहरात आयकर विभाग ऍक्शन मोडमध्ये आलं असून छापेमारी करण्यात येत आहे. गुरुवार, ४ मे सकाळपासून कारवाई सुरु झाल्याचे वृत्त आहे. बांधकाम व्यावसायिकांवर पुणे येथील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे.
पुण्यातील सिंध सोसायटीत आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. सिंध सोसायटीत राहणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई सुरू आहे. हे तिन्ही बांधकाम व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती असून या बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याची माहिती मिळाली आहे.
पुणे परिसरातील पिंपरी आणि औंध परिसरात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. त्यांच्याकडून कागदपत्रांची तपासणी सुरु आहे.
हे ही वाचा:
सर्बियात १३ वर्षांच्या मुलाने शाळेत आठ मुलांना घातल्या गोळ्या
आता घरी बसून पार्किंगची जागा ठरवा
पोलिसांकडून बळाचा वापर; पोलिस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट
राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती!
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये मोठी कारवाई झाली होती. या प्रकरणात बेहिशोबी मालमत्ता उघड झाली असून आयकर विभागाच्या छाप्यात बिल्डर्सचे ३ हजार ३३३ कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघड झाले आहेत. या कारवाईचे धागेदोरे पुणे शहरात असल्याची माहिती होती. त्यामुळे पुण्यात सुरू असलेली कारवाई आणि नाशिकमधील कारवाईचा संबंध आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.