राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात अनेक पडद्यामागील राजकीय घडामोडींचा उल्लेख केला आहे. यात शरद पवारांनी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील २०१९ नंतरच्या घटनांवर प्रकाश टाकला आहे.
२०१९च्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेबाबत शंका असल्याने राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार स्थापन करता येईल का, याची चाचपणी भाजपने सुरू केली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवादही झाला होता. शिवसेनेबाबत मोदी यांना फार आपुलकी नव्हती. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने बरोबर यावे म्हणून मोदी अनुकूल होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपबरोबर जाण्याची इच्छा होती, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे.
‘विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर खासदार संजय राऊत यांनी आपली भेट घेतली होती. सत्तेत समान वाट्याचे वचन भाजप पाळण्याबद्दल त्यांना शंका होती. शिवसेनेला बाजूला ठेवून सरकार स्थापनेचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाल्याने शिवसेनेत भाजपच्या विरोधात खदखद अधिक वाढली होती. तेव्हाच राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार स्थापन करता येईल का, याची चाचपणी भाजपने सुरू केली होती. भाजप आणि राष्ट्रवादीच्या काही निवडक नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवाद झाला होता. मी या प्रक्रियेत सहभागी नव्हतो,’ असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रस्तावावर राष्ट्रवादीमध्ये विचारविनिमय झाल्यावर भाजपबरोबर जायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला. राजकीय संभ्रम राहू नये म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत कल्पना देण्यासाठी संसदेचे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, असे शरद यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाला निवडणुक आयोगाची नोटीस
चेंबूर हादरले; संपत्तीच्या वादातून निवृत्त पोलीस उपायुक्ताच्या मुलाची हत्या
‘द केरला स्टोरी’ विरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन अध्यक्ष ५ मे रोजी ठरणार?
‘भाजपा आणि राष्ट्रवादीची युती होऊ शकत नाही, असे मी मोदींना स्पष्टपणे सांगितले होते. मोदींनी बारामतीमध्ये माझी स्तुती केली होती. तेव्हापासूनच या चर्चा सुरू झाल्या होत्या. शिवसेनेबाबत मोदी यांना फार आपुलकी नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असावी यासाठी मोदी अनुकूल होते,’ असं शरद पवार यांनी लिहिले आहे. शरद पवारांनी त्यांच्या या पुस्तकात अनेक नेत्यांवर टिपण्णी केली असून उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली आहे.