25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणकर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाला निवडणुक आयोगाची नोटीस

कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाला निवडणुक आयोगाची नोटीस

काँग्रेसच्या अडचणी वाढल्या असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा पुत्र प्रियांक खर्गे यांना निवडणूक आयोगाचा दणका

Google News Follow

Related

कर्नाटकमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून राजकीय पक्षांकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. मात्र, काँग्रेसच्या अडचणी वाढल्या असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा पुत्र प्रियांक खर्गे यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे.

काँग्रेसचे प्रचारक प्रियांक खर्गे यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘पंतप्रधान यांच्यासारखा नालायक व्यक्ती असेल तर घर कसं चालेल?’ असे वक्तव्य खर्गे यांनी केलं होतं. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस जारी केली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांना स्पष्टीकरण देणं गरजेचं असणार आहे नोटीसला उत्तर न दिल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाऊ शकते. निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आयोगासमोर उत्तर देण्यासाठी वेळ दिली आहे.

भाजप प्रचारकालाही निवडणुक आयोगाची नोटीस

भाजप उमेदवार बसन गौड पाटील यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी नाग आहेत तर सोनिया गांधी या विषकन्या आहेत’ असे वक्तव्य केले होते. आयोगाने पाटील यांनाही नोटीस बजावली असून त्यांनाही आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.

हे ही वाचा:

चेंबूर हादरले; संपत्तीच्या वादातून निवृत्त पोलीस उपायुक्ताच्या मुलाची हत्या

‘द केरला स्टोरी’ विरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन अध्यक्ष ५ मे रोजी ठरणार?

ड्रोन हल्ल्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन बचावले

येत्या १० मे ला मतदान होणार असून १३ मे ला निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा