सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. निवडणूक प्रचारासाठी तिथे गेलेले असताना मोदींनी पद्म पुरस्कार विजेत्यांची भेट घेतली आणि एक अनोखा सोहळा पाहायला मिळाला. तुलसी गौडा आणि सुकरी बोम्मागौडा यांच्याशी पंतप्रधान मोदींनी अंकोल्यात ही भेट घेतली.
पंतप्रधानांनी त्यांची भेट घेतली तेव्हाचा व्हीडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. पंतप्रधानांनी या दोन्ही पद्म विजेत्यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. त्या दोघींनीही पंतप्रधानांचे हात हाती घेऊन त्यांचे कौतुक केले. त्या दोघीही पंतप्रधानांच्या पाया पडल्या. पण नरेंद्र मोदी यांनी त्यांना तसे न करण्याचे सांगितले. त्या दोघींनी पंतप्रधानांच्या डोक्यावरून, खांद्यावरून मायेने हात फिरवून त्यांना आशीर्वाद दिले. त्यावेळी उपस्थित असलेल्या जनसमुदायानेही या कृतीचे कौतुक केले.
उत्तर कन्नड जिल्ह्यात मोदींची ही भेट झाली आणि मोदींनी त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले. तो सगळा प्रसंग रोमांचकारी ठरला.
#WATCH | Prime Minister Narendra Modi met Tulsi Gowda and Sukri Bommagowda, Padma award recipients from Karnataka, at Ankola in Uttara Kannada district today. pic.twitter.com/GLwCimtb8H
— ANI (@ANI) May 3, 2023
तुलसी गौडा या पर्यावरणवादी आहेत. त्यांना २०२१मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. कर्नाटकातील होन्नाली गावात त्या राहतात. त्यांनी तिथे तब्बल ३० हजार रोपे लावली आणि तेथील वनखात्याच्या रोपवाटिकांची त्या काळजीही घेतात. कर्नाटकातील हलाक्की या आदिवासी समाजातील त्या आहेत. त्यांना वनक्षेत्राच्या एन्साक्लोपीडिया असेही म्हटले जाते. कारण त्यांच्याकडे झाडांच्या विविध जाती प्रजातींची प्रचंड माहिती आहे.
हे ही वाचा:
मुंबईचे डबेवाले ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्सला देणार पुणेरी पगडीचा मान
भाजपच्या नूतन कार्यकारिणीमध्ये नवीन चेहऱ्यांचा भरणा
सेवा क्षेत्राच्या वाढीची गेल्या १३ वर्षातील मोठी भरारी
‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी जाणाऱ्या महिलांना मोफत तिकीट देणार
सुकरी बोम्मगौडा या हलाक्की जमातीच्या अत्यंत प्रिय व्यक्ती आहेत. २०१७मध्ये त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. लोकगीतासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मंगळवारी पंतप्रधानांनी कलबुर्गी येथे रोड शो केला तेव्हाही प्रचंड जनसमुदाय तिथे जमला होता. त्यांनी पुष्पवर्षाव करून पंतप्रधानांचे स्वागत केले, पंतप्रधानांच्या स्वागताच्या घोषणा देत त्यांना शुभेच्छा दिल्या.